आपली रास आणि अर्थव्यवहार
दीर्घकाळ अनेक व्यक्तींच्या व्यवहाराचे निरिक्षण केल्यास प्रत्येक राशीची अशी काही स्वभाववैशिष्ट्य असतात, ती त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसून येतात. अर्थव्यवहार हे त्यापैकीच. प्रत्येक राशीने अर्थ व्यवहार करताना नक्की कशी काळजी घ्यायला हवी, हेच आज आपण जाणून घेणार आहोत….
मेष – केवळ कोणाला तरी माझा शब्द दिला गेला आहे, हा व्यवहार जर मी केला नाही तर माझा शब्द वाया जाईल. लोक काय म्हणतील, अशा अविर्भावात कोणताही निदान मोठा आर्थिक व्यवहार करणे टाळावे. आर्थिक व्यवहारात भावनिकता टाळावी…
वृषभ – नैसर्गिकरित्या भव्यदिव्य काहीतरी करण्याची सवय असलेल्या या राशीने अंथरूण पाहून पाय पसरावे. आवाका नसताना मोठ्या आर्थिक व्यवहारात अडकू नये. मोठ्या रकमांच्या बाबतीत ऐनवेळी कुणावर अवलंबून राहू नये…..
मिथुन
प्रत्येक बाबतीत आपला तात्काळ फायदाच व्हायला हवा, या विचार पद्धतीत अनेक वेळा दीर्घकालीन फायद्याचे आर्थिक व्यवहार हातातून निसटतात. समतोल विचार असावा. फायदा आणि तोटा याच्यामध्ये देखील वाचायला शिकावे….
कर्क
अतिसुरक्षित आर्थिक विचार करण्याच्या पद्धतीमुळे योग्य वेळी योग्य आर्थिक व्यवहार आपल्या हातून होत नाहीत. प्रसंगी रिस्क घ्यावी. प्रत्येक वेळी अतिविचार तोट्याचा ठरतो…..
सिंह
अति धाडसी आर्थिक निर्णयामुळे बरेचदा दीर्घकालीन नुकसान होते. मोठ्या आर्थिक निर्णयात अनुभवी सल्लागार घ्यावे. अनोळखी व्यक्तीवर अधिक विश्वास टाकू नये….
कन्या
अतिचिकित्सक पद्धतीने आर्थिक व्यवहार केल्यास आपल्या फायद्याच्या गोष्टी नंतर कुणी सुचवत नाही. मर्यादित परंतु महत्त्वाचे प्रश्न विचारून आर्थिक व्यवहार करावेत….
(पुढील सहा राशींच्या आर्थिक व्यवहार पद्धतींची माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघू…… आपणही निरीक्षण करा व समतोल आर्थिक व्यवहार करा….)