नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाइल असो की लॅपटॉप यामुळे अनेक कामे जलद गतीने होत असली तरी या अत्याधुनिक साधनांना वारंवार चार्जिंग करण्याची करावी लागते. हा त्रास किंवा अडचणी ग्राहकांना नेहमी सहन करावा लागतो. परंतु आता लॅपटॉपमध्ये वारंवार चार्जिंग करण्याची गरज पडणार नाही. कारण दीर्घ बॅटरी लाइफ असलेला लॅपटॉप बाजारात आला आहे.
Honor कंपनीचा तब्बल 20 तास चालणारा नवीन लॉपटॉप लॉन्च झाला आहे. हा पहिला Honor लॅपटॉप असून तो Windows साठी MagicOS फीचरने सुसज्ज आहे.
MagicOS हा ब्रँडचा इन-हाउस डेव्हलप केलेला डेस्कटॉप यूजर इंटरफेस आहे. विंडोजसाठी मॅजिकओएस म्हणून डब केलेला, हा नवीन इंटरफेस आगामी Honor Notebook आणि Honor स्मार्टफोनसाठी अधिक क्लीनर लुक, चांगली बॅटरी अॅश्युरन्स आणि उत्तम इंटिग्रेशन आणतो.
कंपनीने अधिकृतपणे Honor MagicBook 14 2022 च्या लॉन्चची तारीख Weibo वरील अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर जाहीर केली. Honor कंपनीने स्पष्टपणे सांगितले आहे की, डिव्हाइसमध्ये एक विलक्षण वैशिष्ट्य असेल. Honor MagicBook 14 एकाच चार्जवर 20 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देईल, असा दावा करणारी Apple नंतर दुसरी कंपनी आहे.
कंपनी म्हणते की, बॅटरीची ही अपवादात्मक कामगिरी त्याच्या Windows साठी नवीन MagicOS मुळे आहे, ज्यामध्ये “OS Turbo” नावाचे नवीन वैशिष्ट्य समाविष्ट आहे. Honor notebooks आता OS Turbo च्या मदतीने उर्जा कार्यक्षमतेसाठी अधिक चांगल्या प्रकारे ऑप्टिमाइझ केल्या आहेत. कंपनीचा दावा आहे की, नवीनतम Honor MagicBook 14 2022 OS टर्बोच्या ऑप्टिमायझेशन वैशिष्ट्यांसह 2X% पर्यंत वीज वापर कमी करू शकते.