नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल आणि संगणकाचा प्रमाणेच जलद काम करण्यासाठी लॅपटॉपचा वापर वाढला आहे. लॅपटॉपमुळे कोणत्याही ठिकाणाहून काम करणे शक्य होते. त्यातच अलिकडच्या काळात वर्क फ्रॉम असो की, प्रवासात किंवा बाहेरगावी जाऊन मेन ऑफिसला कोणतेही काम पाठवण्याचा उद्देश असो, यासाठी लॅपटॉप महत्त्वाची बाब ठरू लागले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांचे लॅपटॉप बाजारात दिसत आहेत. त्यातच आता आपण नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असल्यास, निवडण्यासाठी आणखी दोन पर्याय आहेत.
विक्री Amazon India वर दि. 6 एप्रिलपासून : टेक कंपनी Honor ने बाजारात आपले दोन नवीन लॅपटॉप MagicBook Series X14 आणि X15 लॉन्च केले आहेत. कंपनीचे हे नवीन लॅपटॉप फुल एचडी स्क्रीन, स्लीक बॉडी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतात. Intel Core i3 सह X14 लॅपटॉपची किंमत 38,990 रुपये आणि i5 एडीशनची किंमत 48,000 रुपये आहे. त्याच वेळी, इंटेल कोर i3-सुसज्ज X15 साठी, तुम्हाला 40,990 रुपये खर्च करावे लागतील. सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या या लॅपटॉपची विक्री Amazon India वर दि. 6 एप्रिलपासून सुरू होईल.
वैशिष्ट्ये व तपशील : दोन्ही लॅपटॉपमध्ये ऑल-मेटल बॉडी फिनिशसह मानक आयताकृती डिझाइन आहे. पॉप-अप वेबकॅम आणि स्लिम बेझल्समुळे लॅपटॉप खूपच प्रीमियम दिसतो. कंपनी या लॅपटॉपमध्ये इंटिग्रेटेड फिंगरप्रिंटसह पॉवर बटण देखील देत आहे. हे लॅपटॉप 14 इंच आणि 15.6 इंच स्क्रीन आकारासह येतात. डिस्प्ले फुल एचडी रिझोल्युशन आहे आणि त्याचा आस्पेक्ट रेशो 16:9 आहे.
फास्ट चार्जिंग सपोर्ट : लॅपटॉप 8 GB रॅम आणि 512 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहेत. यामध्ये कंपनी 10th जनरेशन i3/i5 प्रोसेसरचा पर्याय देत आहे. तसेच बॅटरीमध्ये तर 14-इंचाच्या वेरिएंटमध्ये 56Wh आणि 15.6-इंचाच्या वेरिएंटमध्ये 42Wh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी दोन्ही लॅपटॉपमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देत आहे.
अन्य सुविधा : कनेक्टिव्हिटीसाठी, नवीन लॅपटॉपमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, यूएसबी 3.0 टाइप-ए पोर्ट, यूएसबी 2.0 टाइप-ए पोर्ट, एचडीएमआय पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे. त्याच वेळी, वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी या लॅपटॉपमध्ये ब्लूटूथ 5.0 आणि ड्युअल-बँड वाय-फाय मिळेल.