इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही वर्षात ऑनर किलिंगचे भयानक प्रकार घडत आहेत. आताही असाच एक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणाचा राग मनात धरून वडिलांनी पुतण्या आणि मेहुण्याच्या मुलासह एका रात्री अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून केला. तसेच गंगेच्या तीरावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अस्थिकलश नदीत टाकण्यात आला. बरेली प्रांताच्या सिरौली पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध खुनाचा, पुरावा लपवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी असलेले मुलीचे वडील पोलीस कोठडीत आहेत. धरमपुरा गावातील विद्यार्थिनीचे तिच्या मावशीच्या घरी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रेमप्रकरणाची संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे.
या प्रेम प्रकरणाची बदनामी झाल्यावर वडिलांनी मुलीला खूप समजावले पण ती तिच्या सांगण्यावर ठाम राहिली. त्यानंतर मुलगी दहा दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. मुलीची हत्या तिच्या वडिलांनी केल्याचा आरोप आहे. त्यावरून पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता वडिलांनी खुनाची कबुली दिली.
या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांना सांगितले की, गावातील एका इसमाने त्याचा पुतण्या आणि बिलारी येथे राहणाऱ्या भावाच्या मुलासह कट रचत आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने गंगेच्या तीरावर अंत्यसंस्कार केले आणि अस्थिकलश नदीत फेकून दिला. पूराव्याच्या आधारे पोलिसांनी आढावा घेतला असून फॉरेन्सिक टीमने याचे नमुने घेतले आहेत. याप्रकरणी सिरौली पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मुलीचे वडील कोठडीत आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे.
पोलिस कोठडीत वडिलांनी सांगितले की, आपल्या मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे गावात कुटूंबाची बदनामी होत असल्याचे सांगत त्याने तिला मनाई केली. त्या मुलाशी डेटिंग करणे थांबव, परंतु तिने ऐकले नाही. आम्ही घरी नसताना मुलगी प्रियकराला घरी बोलावत असे. यामुळे आम्ही तिला मुलीला मारण्याचा निर्णय घेतला.
मयत मुलगी तिच्या चार भावंडांमध्ये मोठी होती. म्हणूनच आई-वडिलांची आपुलकी होती आणि सर्वात जास्त विश्वासही होता. मात्र मावशीच्या घरी राहणाऱ्या तरुणाच्या प्रेमाच्या जाळ्यात ही तरुणी कशाप्रकारे अडकली, ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यानंतर प्रेयसी बेपत्ता झाल्याने प्रियकरही घाबरून पळून गेल्याची गावात चर्चा आहे.
मुलीच्या आईने रडत रडत सांगितले की, मी माझ्या माहेरी गेले होते. परत आल्यावर पतीला मुलीबद्दल विचारले असता, पतीने सांगितले की, चाकरपूर येथील एक मुलगा हातात पिस्तूल घेऊन काही नागरिकांसह घरात घुसला. त्यांनी आपच्या मुलीला जबरदस्तीने घराबाहेर पळवून नेण्याची धमकी दिली. नंतर कोणताही संभाषण न करता त्याने मुलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.