इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हरियाणाच्या पलवल येथे हनीट्रॅपच्या प्रकरणात महिला वकील, एसएसआईसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही जण एका डॅाक्टरकडून १० लाख रुपयाची खंडणी मागत होते.
हे प्रकरण बामनीखेडा – दीघोट रोडवर असलेल्या नर्सिंग होमचे संचालक डॅा. बिजेंद्र सिंह यांच्या तक्रारीनंतर समोर आले. या डॅाक्टरांना एका महिलेचा फोन आला. त्यात मी अॅडव्होकेट पूनम राव असल्याचे सांगितले. नंतर हॅास्पिटलमध्ये तुम्ही मुलीची छेडछाड केल्याचा आरोप लावला. त्यानंतर डॅाक्टरांना पलवल येथील ओमैक्स सिटी येथे बोलावले. त्यानंतर १० लाख रुपयाची मागणी केली. त्यात पैसे दिले नाही तर छेडछाडीची केस दाखल करुन सोशल मीडियात बदनामी करेल.
या धमकीनंतर डॅाक्टरांनी ७ लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी डॅाक्टरांना साईन केलेले नोटा दिल्या. त्यानंतर त्यांना अॅडव्होकेट पूनमच्या घरी पाठवले. डॅाक्टरांना पहिले ६ लाख रोख दिले. त्यानंतर फोन पेवरुन ६० हजार रुपये दिले. त्यानंतर ४० हजार नंतर देण्याचे आश्वासन दिले.
पैसे देऊन जसे डॅाक्टर बाहेर पडले तसे पोलिसांनी अॅड. पूनम रावला अटक केली. यावेळी एसएसआई नेतराम याला पकडले. तो पैसे मोजत होता. त्यानंतर मुलगी व तिच्या आईलाही ताब्यात घेण्यात आले. अॅड. पूनम रावला याअगोदर २०२२ मध्ये पिस्टलबरोबर फायरींग करण्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी अटक झालेली आहे.