पाटणा (बिहार) – जागतिक महायुद्धांच्या काळातही शत्रू राष्ट्राची माहिती काढून घेण्यासाठी परस्परांविरोधात ‘हनी ट्रॅप’ लावले जात असत. त्यामुळे हनी ट्रॅप’ हा प्रकार नवा नाही. याचे काही दाखले आपल्याला देशात प्राचीन ग्रंथातही मिळतात. प्रत्येक लष्करासह क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात. राजकारण, कॉर्पोरेट क्षेत्र, चित्रपट , क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांमध्ये कधी ना कधी याचा वापर होत आला आहे.सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘हनी ट्रॅप’च स्वरूप बदलले आहे. यापूर्वी ‘हनी ट्रप’ लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत असे. आता मात्र फेसबुक, व्हॉट्सअॅप, हाइक, वी चॅट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सावज हेरले जाते व अनेकदा प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते किंवा त्याला जाळ्यात अडकवले जाते.
सध्या भारतीय लष्कराची गुप्त माहिती लीक केल्याप्रकरणी लष्करी जवान गणेश कुमार याला अटक करण्यात आली आहे. तो सतत आयएसआय एजंटच्या संपर्कात होता. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्यात मेडिकल कॉर्प्समध्ये तैनात असलेल्या या जवानाच्या मोबाईलवरून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. दोन वर्षांपासून आयएसआयच्या महिला एजंटच्या संपर्कात असताना तिने व्हॉट्सअॅपवर शेकडो वेळा बोलले आणि चॅट केले, असे सांगितले जाते. खरे म्हणजे मोहात पाडू शकणाऱ्या किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे व विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेण्याच्या पद्धतीला ‘हनी ट्रॅप’ म्हणतात. ब्रिटीश इंग्रजीमध्ये हा शब्द चांगलाच प्रचलित आहे. हेरगिरीच्या जगात ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली. या प्रकारावर हॉलिवूडमध्येच नव्हे तर बॉलीवुडमध्येही अनेक चित्रपट तयार गेले आहेत.
सध्याच्या काळात एखादा अनोळखी पण महत्त्वाचा मोबाईल क्रमांक शोधून त्यावर स्वतःची जुजबी माहिती देणारा पहिला मेसेज टाकला जातो. कुतूहल म्हणून एखाद्याने त्यास प्रतिसाद दिला, की मग गोड बोलून जवळीक साधण्यास सुरुवात होते. मग त्याने केलेल्या सेक्स चॅटचा वापर करून खंडणी मागितली जाते. सतत व्हॉट्सअॅप मेसेज करून किंवा कॉल करून रिलेशनशीप ठेवण्याची मागणी करण्यात येते.
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये तैनात गणेश कुमार जवळपास दोन वर्षांपासून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होता. गणेश कुमारला अटक होण्यापूर्वी त्याच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती, असे सांगण्यात येते. गणेश हा जोधपूरमध्ये तैनात असताना तेथेच आयएसआयच्या महिला एजंटच्या संपर्कात होता. नंतर त्यांची पुण्यातील मेडिकल कॉर्प्समध्ये बदली झाली. बिहार एटीएस, मिलिटरी इंटेलिजन्स आणि पाटणा पोलिसांनी आयएसआयला गुप्तचर माहिती लीक केल्याप्रकरणी दि. १४ नोव्हेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो तुरुंगात आहे.
आयएसआयची महिला एजंट त्याच्याशी व्हॉट्सअॅपवर बोलायची. महिला एजंटने नौदलाची वैद्यकीय कर्मचारी असल्याची ओळख दिली होती. तसेच गणेशकडून जप्त केलेल्या मोबाईलच्या तपासात दोन वर्षापासून दोघेही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सतत एकमेकांच्या संपर्कात असल्याचे चौकशीत उघड झाले. गणेश कुमारच्या जप्त केलेल्या मोबाईलचा आयपी अॅड्रेस आणि आयएसआयच्या महिला एजंटच्या क्रमांकावरून हा प्रकार उघड झाला असून दोन्ही मोबाईलचे आयपी अॅड्रेस सतत एकमेकांच्या संपर्कात होते. या प्रकारामुळे लष्कराच्या विभागात खळबळ उडाली असून याप्रकरणी सखोल चौकशीनंतर आणखी बरीच माहिती समोर येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.