मुंबई – होंडा या प्रसिद्ध कारनिर्माता कंपनीने आपल्या वाहनांवर इयर एंड सेलची घोषणा केली आहे. डिसेंबरमध्ये होंडाच्या कार ४५ हजार रुपयांपर्यंत स्वस्त होणार आहेत. या ऑफरअंतर्गत कॅश डिस्काउंट, फ्री एक्सेसरिज आणि एक्सचेंज बेनिफिट मिळत आहे. ऑफरचा लाभ ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत घेता येणार आहे. कोणत्या कारवर किती सवलत मिळणार आहे हे जाणून घेऊया.
होंडा सिटी (पाचवी जनरेशन)
न्यू जनरेशन होंडा सिटीच्या सर्व प्रकारांवर ४५,१०८ रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. त्यामध्ये ७,५०० रुपयांचे कॅश डिस्काउंट किंवा ८,१०८ रुपयांपर्यंतची मोफत एक्सेसरीज, १५ हजार रुपयांचा कार एक्सचेंज बेनिफिट, ५००० रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि ९ हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. तसेच ८ हजार रुपयांचे कॉर्पोरेट डिस्काउंटही दिले जात आहे.
होंडा जॅझ
होंडा जॅझ हॅचबॅक कारवर ३५,१४७ रुपयांपर्यंतची सवलत दिली जात आहे. त्यामध्ये १० हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक डिस्काउंट, १२,१४७ रुपयांचे मोफत एक्सेसरीज, पाच हजार रुपयांचा कार एक्सचेंज बेनिफिट, ५ हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस, ९ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपयांच्या डिस्काउंटचा समावेश आहे. कारची किंमत ७.६५ लाख रुपये ते ९.८९ लाख रुपयांपर्यंत असेल.
होंडा डब्ल्यूआर-व्ही
होंडा डब्ल्यूआर-व्ही लिस्टमधील ही तिसरी कार आहे. या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटवर २८ हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळत आहे. डिस्काउंटअंतर्गत दहा हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बेनिफिट, ५ हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस, ९ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. कारची किंमत ७.६५ लाख रुपयांपासून ते ९.८९ लाख रुपयांपर्यंत आहे.
होंडा सिटी (चौथी जनरेशन)
होंडा सिटीच्या जुने मॉडेलसुद्धा तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकतात. या कारच्या सर्व पेट्रोल व्हेरिएंटवर २२ हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळत आहे. ग्राहकांना पाच हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस, ९ हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. कारची किंमत ९.२९ लाख रुपयांपासून ते ९.९९ लाख रुपयांपर्यंत आहे.
होंडा अमेझ
सेडान होंडा अमेझ या कॉम्पॅक्ट कारवर कंपनीकडून १५ हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स ऑफर करण्यात आली आहे. ग्राहकांना पाच हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस, ६ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि चार हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. कारची किंमत ६.३२ लाख रुपयांपासून ते ११.१५ लाख रुपयांपर्यंत आहे.