गुरूवार, ऑगस्ट 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

होमिओपॅथी उपचारांशी संबंधित तुम्हालाही आहेत का हे गैरसमज?

by Gautam Sancheti
जून 20, 2023 | 4:29 pm
in इतर
0
homeopathy

होमिओपॅथी उपचारांशी संबंधित हे आहेत गैरसमज

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते होमिओपॅथी ही जगातील दुसरी सर्वात मोठी औषध प्रणाली आहे. त्वचा व केसांच्या समस्या, श्वसनविषयक समस्या, मानसिक आरोग्य समस्या, कमी रोगप्रतिकारशक्ती, टॉन्सिलिटिस, मायग्रेन, रजोनिवृत्ती, वजन व्यवस्थापन आणि वंध्यत्व यासारख्या विविध आजारांवरील उपचारामधील गुणकारी परिणामांमुळे अनेक देशांमध्ये या पूरक औषध प्रणालीचा सकारात्मकपणे अवलंब केला जातो. भारत २००,००० नोंदणीकृती होमिओपॅथिक डॉक्टर्स/फिजिशियन्ससह जगामध्ये अग्रस्थानी आहे आणि जवळपास १०० दशलक्ष व्यक्ती उपचारासाठी होमिओपॅथीवर अवलंबून आहेत. जगातील सर्वात वेगाने वाढणारी वैद्यकीय प्रणाली असूनही होमिओपॅथीबद्दल अनेक गैरसमज अजूनही अस्तित्वात आहेत. डॉ. बत्रा’ज हेल्थकेअरचे संस्थापक व अध्यक्ष पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. मुकेश बत्रा यांनी होमिओपॅथी उपचाराबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

Dr Mukesh Batra

गैरसमज १: होमिओपॅथी उपचार संथगतीने काम करते:
होमिओपॅथीने गेल्या काही वर्षांमध्ये तीव्र आजाराच्या उपचारांमध्ये उत्कृष्ट परिणाम दाखवले आहेत. परिणामी जुलाब, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखे आजार होमिओपॅथिक उपचारांसह त्वरित बरे होत आहेत. संधिवात, दमा, एलर्जी, चिंता आणि नैराश्य यासारख्या दीर्घकालीन आजारांवर उपचार होण्यास वेळ लागतो, कारण या आजारांवर मुळापासून उपचार केले जातात.

गैरसमज २: होमिओपॅथी हा फक्त प्लेसबो इफेक्ट आहे:
हा एक सामान्य गैरसमज आहे, ज्यामधून निदर्शनास येते की होमिओपॅथीचे परिणाम फक्त मानसिक असतात आणि त्यांचा शरीरातील शारीरिक बदलांशी काहीही संबंध नाही. होमिओपॅथीच्या परिणामकारकतेची वैज्ञानिकदृष्ट्या पुष्टी करण्यासाठी अनेक क्लिनिकल आणि डबल-ब्लाइण्ड तपासण्या करणत आल्या आहेत. तसेच, होमिओपॅथिक उपचाराने बरे झालेल्या लाखो केसेस वैद्यकीय डेटाद्वारे प्रमाणित केल्या गेल्या आहेत आणि ते त्याच्या वैज्ञानिक परिणामकारकतेचा पुरावा आहेत.

गैरसमज ३: होमिओपॅथी औषधे सुरक्षित नाहीत:
होमिऑपथी हे जगातील सर्वात सुरक्षित औषधोपचारांपैकी एक आहे. याचे कोणतेही घातक किंवा नकारात्मक परिणाम होत नाहीत, कारण ते डायल्यूट केले जाते आणि लहान डोसमध्ये दिले जातात. पण स्वत:हून उपचार सुरू करण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सक्षम होमिओपॅथचा सल्ला घ्यावा.

गैरसमज ४: होमिओपॅथीचा इतर उपचारांसह वापर करता येऊ शकत नाही:
होमिओपॅथीचा वापर इतर उपचारांसोबत करता येतो. होमिओपॅथीकडे येणारे रुग्ण अनेकदा दीर्घकालीन तक्रारी घेऊन येतात आणि ते आधीच इतर प्रकारच्या औषधांचे सेवन करत असतात. ते सेवन करत असलेली काही अ‍ॅलोपॅथिक औषधे अचानक बंद करता येत नाहीत. रासायनिक औषध सेवन करणे थांबवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून, होमिओपॅथीचा अवलंब करत इतर प्रकारचे उपचार हळूहळू थांबवणे उत्तम आहे.

गैरसमज ५: होमिओपॅथिक उपचारांमुळे आहाराबाबत पथ्ये पाळावी लागतात:
होमिओपॅथिक औषधोपचार करताना कोणतीही विशिष्ट आहाराविषयक पथ्ये पाळावील लागत नाही. आजारानुसार आहारविषयक पथ्ये पाहण्याचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांना मीठाचे सेवन कमी करण्यास सांगितले जाते आणि मधुमेह असलेल्या रूग्णांना गोड पदार्थ व कर्बोदकांचे सेवन कमी करण्यास सांगितले जाते. बहुतांश होमिओपॅथ चांगल्या परिणामकारकतेसाठी होमिओपॅथिक औषधे घेण्यापूर्वी अर्ध्या तासाच्याअंतराची शिफारस करतात.

होमिओपॅथी सुरक्षित, किफायतशीर आणि सहज उपलब्ध असल्याने ही एक औषध प्रणाली आहे, जी आपल्या देशाच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात योग्य आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? राष्ट्रवादी काँग्रेसने केला हा दावा

Next Post

वारी पंढरीची (भाग ६) विजयनगरच्या साम्राज्यातून विठ्ठलाला परत आणणारे || संत भानुदास ||

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Screenshot 20250828 063447 Collage Maker GridArt
महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील या चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर…शिक्षक दिनानिमित्त दिल्लीत समारंभ

ऑगस्ट 28, 2025
Next Post
FXcieCYagAAd Rm e1687259205100

वारी पंढरीची (भाग ६) विजयनगरच्या साम्राज्यातून विठ्ठलाला परत आणणारे || संत भानुदास ||

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011