मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वत्तीने गट-अ आणि गट-ब पदांसाठी महाराट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दि.४/६/२०२३ रोजी घेण्यात येत आहे.याकरिता दि.२४/२/२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्याअंतर्गतच राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन सेवेतील सहायक आयुक्त (गट अ) आणि अन्न सुरक्षा अधिकारी (गट ब) या संवर्गाचा देखील समावेश होता. सदर पदासाठी वैदयकीय शाखांचे म्हणजेच आयुर्वेदिक, होमिओपॅथी व युनानी इं. ची पदवी असलेल्या उमेदवारांचे अर्ज मान्य करण्यास येत नव्हते. मात्र यापुर्वी झालेल्या भरती प्रक्रियेत अर्ज मान्य करण्यात आले होते.
त्याविरोधात आयुर्वेदिक पदवीधारकारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे धाव घेऊन याचिका क्रमांक ३७०/२०२३ दाखल केली होती. त्यासंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दि.०५/०४/२०२३ रोजीच्या अंतरिम आदेशान्वये आयुर्वेदीक पदवीधारक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची मुभा दिली होती व तसे आदेश आयोगाला दिले होते. सदर आदेशामधे आयुर्वेदिक, होमिओपॅथी व युनानी इत्यादी देखील वैदकीय शाखाच आहेत असे निरिक्षण नोदविले होते. त्याबाबत आयोगाने शुद्धीपत्रक प्रसिद्ध करून आयुर्वेदिक पदवीधारक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
डॉ. नितीन शिंपी (होमिओपॅथी) पदवीधारक यांनी अशीच मुभा मिळण्याकरिता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल केला होता मात्र केवळ उशिरा अर्ज केल्याच्या कारणाने न्यायाधिकरणाने १८/०५/२०२३ रोजी डॉ. नितीन शिंपी यांना अशी मुभा देण्याचे नाकारले होती. त्यावर व्यथित होवून डॉ. शिंपी यांनी मा. उच्च न्यायालयात याचिका क्र. ६४२४/२०२३ दाखल केली होती.
सदर प्रकरणाची दि.२२/०५/२०२३ व दि २९/०५/२०२३ रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती . सदर सुनावणीत याचिकाकर्ते यांच्याकडुन अॅड.स्नेहा भांगे व अॅड.प्रजित सहाने यांनी भक्कमपणे बाजु मांडल्याने उच्च न्यायालयाने याचिकाकर्त (होमिओपॅथी पदवीधारक) यांना दिलासा आहे. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त यांचे म्हणणे विचारात घेऊन वरिल पदासाठी अर्ज सादर करुन परिक्षेस बसण्याची परवानगी दिली आहे. तसेच याचिकाकर्ते यांना २४ तासात प्रवेशपत्र (हॉल तिकीट) देण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाच्या वतीने श्रीमती आर.एम.शिंदे यांनी कामकाज पाहिले.
Homeopath Graduate High Court Order