शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

घरांची विक्री मंदावली,खरेदीदार अधिक सावध…बघा, हा अहवाल

by Gautam Sancheti
जुलै 14, 2025 | 6:40 pm
in संमिश्र वार्ता
0
Mhada Home e1680604067392

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन अँड अॅडव्हाईझरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉम च्या अलीकडच्या अहवालानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या किंमतींबाबत चिंता करणाऱ्या खरेदीदारांनी थोडे थांबून वाट बघण्याचा दृष्टिकोन अंगिकारला, ज्यामुळे या तिमाहीत भारतातील 8 प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये घरांची विक्री वार्षिक १४%ने कमी झाली.

हाऊसिंग डॉटकॉमचे स्वामित्व ज्यांच्याकडे आहे त्या आरईए इंडियाचाच एक भाग असलेल्या प्रॉपटायगर डॉटकॉमने सादर केलेल्या रिअल इनसाइट रेसिडेन्शियल- एप्रिल-जून २०२५ अनुसार, बंगळूर, चेन्नई आणि कोलकाता वगळता सर्व शहरांमध्ये घरांच्या विक्रीचे प्रमाण कमी झाले. या तिमाहीत सर्वात तीव्र घट दिसून आली ती एमएमआर (-३२%) आणि पुणे (-२७%) येथे. क्रमिक आधारावर, एकंदर विक्री स्थिर राहिली तर काही बाजारपेठांमध्ये वृद्धी देखील दिसली. एमएमआर (२७%) आणि पुणे व बंगळूर (प्रत्येकी १६%) यांचे त्रिमासिक विक्रीत सर्वाधिक योगदान होते. एकंदर आकडेवारीत त्यांचा एकत्रित वाटा ५९% होता.

प्रॉपटायगर डॉटकॉमचे हेड ऑफ सेल्स श्रीधर श्रीनिवासन म्हणाले, “घरांच्या विक्रीत आणि नवीन लॉन्च मध्ये थोड्या काळासाठी झालेली ही घसरण मागणी कमी झाल्याची सूचक नसून ते पुनःअंशन आहे. खास करून बजेट आणि मध्यम –उत्पन्न असलेल्या सेगमेन्टमध्ये ‘आपल्याला घर परवडणार का’ या दबावामुळे खरेदीदार अधिक सावध झाले आहेत. तथापि मुळाशी असलेली मागणी मात्र तशीच आहे, ज्याचा पुरावा काही शहरांमधील क्रमिक वृद्धीमधून तसेच एमएमआर, पुणे आणि बंगळूरसारख्या मुख्य बाजारांच्या निरंतर प्रभुत्वामधून मिळतो.”

श्रीनिवासन पुढे म्हणाले, “२०२५ मधील पहिल्या सहामाहीत धोरणात्मक जमीन अधिग्रहणाच्या लाटेत विकासकांची गुंतवणूक चालू ठेवण्याची (विशेषतः प्रीमियम ऑफरिंग्जमध्ये) इच्छा देखील स्पष्ट दिसत आहे. यातून भारताच्या हाऊसिंग बाजारात दीर्घकालीन विश्वासाचा संकेत मिळतो.

मागणीतील मंदीमुळे नवीन लॉन्चची संख्या कमी झाली
या अहवालात दिसून येते की, दुसऱ्या तिमाहीत जिओपॉलिटिकल कारकांचा प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे नवीन घरांचा पुरवठा मागील तिमाहीच्या आणि मागील वर्षाच्या तुलनेत देखील कमी झाला आहे. या तिमाहीतच भारत आणि शेजारी देश पाकिस्तान यांच्यातील सीमा संघर्ष टोकाला गेला होता, आणि दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केला होता.

शहर-निहाय विश्लेषणात वेगवेगळे ट्रेंड दिसतात. एमएमआर, पुणे आणि अहमदाबाद येथे नवीन लॉन्चमध्ये घसरण झालेली दिसते तर इतर बाजारपेठांमध्ये वाढ झालेलीही दिसते. कोलकातामध्ये जून तिमाहीत लॉन्चचे प्रमाण तिपटीने वाढलेले दिसते, ज्याचे कारण प्रामुख्याने त्यांचा बेस कमी असणे हा होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबा संस्थानला ६.३१ कोटींहून अधिक देणगी प्राप्त

Next Post

पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना; विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
VidhanSabha prashnottare 04 1024x512 1

पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना; विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011