नवी दिल्ली/मुंबई – क्वारंटाईन असताना काय करायचे, हा सध्याचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. ज्यांना लक्षणे आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना लक्षणे नाहीत त्यांच्यासाठीही. विशेषतः कुठली काळजी घ्यावी, काय खावे, काय खावू नये, व्यायाम करावा की नाही, इम्युनिटी वाढविण्यासाठी काय करावे, या सर्व प्रश्नांबाबत आता सर्वसामान्य माणूस जागरुक झाला आहे.
सध्या लाखो रुग्ण घरातच राहून उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी खालील टीप्स अत्यंत मोलाच्या ठरू शकतात.
१. औषधांसोबत दिवसातून चार लिटर कोमट पाणी प्यावे. थंड पाणी टाळावे.
२. दिवसातून तीन ते चार वेळा वाफ घ्यावी, त्याने खूप आराम होतो.
३. सर्दी, खोकला, ताप असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा
४. व्हिटामीन सी असलेले फळ, भाज्या खाव्या. आवळा, संत्री, लिंबू यांच्यात व्हीटामीन सी मोठ्या प्रमाणात असतो.
५. फ्रीजमध्ये ठेवलेले थंडे पदार्थ खावू नका. ते पदार्थ गरम करूनच खावे.
६. शिळे अन्न खाणे पूर्णपणे टाळावे
७. तुळस, लवंग, काली मिर्च, अजवाईन, आले, हळद आणि मीठ यांच्या मिश्रणाचा काढा तयार करावा आणि दिवसातून कमीत कमी दोनवेळा जरूर प्यावा.
८. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या. यातून सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
९. हळदीचे दूध या दिवसांमध्ये अत्यंत लाभदायक आहे.
१०. बाजारात उघड्यावर विकले जाणारे पदार्थ खावू नका.
११. बाहेरून काही खाण्याचे पदार्थ किंवा फळं आणले तरीही गरम करून घ्यावे किंवा धुवून घ्यावे
१२. थोड्याथोड्या वेळाने २० सेकंदांपर्यंत साबणाने हात धुवायला मुळीच विसरू नका
१३. घरात स्वच्छता ठेवायला विसरू नका
१४. अस्वच्छ हातांचा नाकाला किंवा तोंडाला स्पर्ष होऊ देऊ नका
१५. आजारी असाल, लक्षणं असतील तर घरातही मास्क लावून राहावे.
१६. कुणाशीही बोलताना कमीत कमी ५ फुटांचे अंतर राखा. हात मिळविणे, गळे लागणे टाळा.
१७. योग आणि प्राणायाम केल्यास फुप्फुसे उत्तम राहतात.