मुंबई – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दुसऱ्यांदा कोरोना बाधित झाले आहेत. यापूर्वीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तरीही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना बाधा झाल्याची माहिती वळसे-पाटील यांनीच दिली आहे.
वळसे-पाटील यांनी म्हटले आहे की, कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे. नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 28, 2021