पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन दिवसाच्या पुणे दौ-यातील कार्यक्रमानंतरच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहे. दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये त्यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी ‘ पोर्टलचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांचा वेळ राखीव होता.
‘सहकार से समृद्धी ‘ पोर्टलचे उद्घाटन झाल्यानंतर अमित शाह मुक्कामी असलेल्या डब्ल्यू मेरियट हॉटेलला परत जाणार होते. त्याठिकाणी बैठका होणार होत्या. त्या बैठका अमित शह यांनी रद्द केल्या आहेत. आता अमित शहा ३ वाजता पुणे विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना होणार आहे.
शनिवारी सायंकाळी अमित शाह हे पुणे शहरात दाखल झाले होते. त्यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा होता. शनिवार अन् रविवारी पूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. रात्री त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर ४५ मिनिटे चर्चा केली. त्यानंतर रविवारी त्यांच्या हस्ते कार्यक्रम होता. त्यानंतर या बैठका होत्या. या बैठका रद्द करण्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
home minister amit shah pune meets cancelled delhi return
politics bjp maharashtra