इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात वस्तू विनिमय पद्धत होती म्हणजे पैशाच्या बदल्यात किंवा चलन ऐवजी वस्तू एकमेकांची देवाण-घेवाण करून व्यवहार होत असत. उदाहरणार्थ ज्वारी – बाजरीच्या बदल्यात भाजीपाला देणे तसेच एखादे भांडे देऊन दुसरीच एखादी वस्तू घेणे, असे व्यवहार चालत. त्याचप्रमाणे बलुतेदारी पद्धत देखील होती, त्यामध्ये देखील बलुतेदारांकडून काम केल्यावर त्याला पैसे ऐवजी धान्य देण्यात येई. परंतु आधुनिक काळात जगातील बहुतांश देशांमध्ये आता चलन व्यवस्था आहे. म्हणजे पैशाच्या मोबदल्यातच कोणतीही वस्तू विकत घेता येते. परंतु तुम्हाला टरबूज किंवा लसूण याच्या बदल्यात घर विकत मिळू शकते ? हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. परंतु सध्या चीनमध्ये असा प्रकार सुरू आहे. मालमत्ता बाजारातील मंदीच्या काळात, चिनी रिअल इस्टेट कंपन्यांनी डाऊन पेमेंट म्हणून टरबूज आणि लसूण यांसारखी कृषी उत्पादने घेण्यास सुरुवात केली आहे.
एका चीन विकसकाच्या मते, घर खरेदीदार 20 युआन किंवा किलो दराने टरबूज देऊन पैसे देऊ शकतील. चीनमधील कोविड-19 निर्बंधांमुळे जानेवारी ते जून या कालावधीत मालमत्तेची विक्री 25 टक्के कमी झाली आहे. चीनचे रिअल इस्टेट मार्केट सध्या धोकादायक मंदीतून जात आहे आणि यामुळे अनेक खरेदीदार निराश झाले आहेत. आता स्थिती अशी आहे की मंदीचा सामना करणाऱ्या विकासकांनी घराचे पैसे म्हणून टरबूज, पीच आणि इतर कृषी उत्पादने स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
चीनचे सरकारने आपल्या अहवालात लिहिले आहे की, चीनच्या तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीतील शहरांमधील रिअल इस्टेट विकासकांनी अलीकडेच अनेक प्रचार मोहिमा सुरू केल्या आहेत, ज्यात घर खरेदीदारांना त्यांच्या डाउन पेमेंटचा काही भाग देण्यास सांगितले आहे. गहू आणि लसूण देण्यास देखील प्रोत्साहन दिले जात आहे.
अतिरिक्त शेतीमाल विकण्याऐवजी नव्याने बांधलेली घरे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आकर्षित करतील अशी विकासकांची आशा आहे. पूर्व चीनच्या जिआंग्सू प्रांतातील नानजिंगमधील एका रिअल इस्टेट डेव्हलपरने एक असामान्य विपणन धोरण सुरू केले, ज्यामध्ये घर खरेदीदारांना टरबूजांपासून 20 युआन प्रति किलोग्राम दराने पैसे देण्याची ऑफर दिली गेली.
दि. 28 जून ते 15 जुलै या कालावधीत सुरू होणार्या प्रचार मोहिमेचे पोस्टर मध्ये दिले आहे की, रिअल इस्टेट डेव्हलपर घर खरेदीदारांना 5,000 किलोग्रॅम टरबूज म्हणजे ज्याची किंमत 100,000 युआन आहे त्यांना आम्ही घर देण्यास परवानगी देतो. स्थानिक टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना आधार देणे हा त्याचा उद्देश असल्याचेही लिहिले होते.
तथापि, अहवालानुसार, या रिअल इस्टेट कंपनीच्या प्रतिनिधीने नंतर सांगितले की मुख्यालयाच्या आदेशानंतर ही विचित्र प्रचार मोहीम स्थगित करण्यात आली आहे. आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अशी सर्व पोस्टर्स काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. एका रिपोर्ट्सनुसार, चीनमधील अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की चीनमधील घरांच्या विक्रीत गेल्या सलग 11 महिन्यांपासून घट झाली आहे आणि मे महिन्यात ती गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 31.5 टक्क्यांनी कमी होती.
वास्तविक, हा मंदीचा परिणाम चीनमध्ये दिसून येत आहे आणि यासाठी चिनी रिअल इस्टेट डेव्हलपर्स पेमेंटऐवजी टरबूज घेत आहेत. याशिवाय इतर कृषी उत्पादनेही पेमेंट म्हणून स्वीकारली जात आहेत. चीनच्या टियर 3 आणि 4 शहरांमधील रिअल इस्टेट डेव्हलपर्सनी अलीकडेच विविध प्रचार मोहिमा सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये घर खरेदीदारांना त्यांच्या डाउन पेमेंटचा काही भाग गहू आणि लसूणसह भरण्याची परवानगी दिली जात आहे.
Home buyer payment watermelon garlic barter system