इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘अवतार’ हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. २००९ मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा बॉक्स ऑफिसवर त्याने तुफान कमाई केली होती. १३ वर्षांनंतर प्रेक्षकांमध्ये त्याची सीक्वेल पाहण्याची उत्सुकता कायम आहे का, अशी शंका उपस्थित होत होती. मात्र, हे सगळे अंदाज चुकवत ‘अवतार २’ ने पहिल्याच दिवसापासून कमाल केली. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन तब्बल तीन अब्ज डॉलर्सच्या जवळ पोहोचलं होतं.
जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार २’ हा हॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाचा पहिला भाग २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागानेही कमाईचे विक्रम प्रस्थापित केले होते. आता दुसऱ्या भागानेही जगभरात प्रचंड कमाई केली आहे. भारतातही या चित्रपटाची भरपूर क्रेझ आहे.
शुक्रवारी ‘अवतार २’ ने तब्बल ४१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता पहिल्या वीकेंडच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे बघितल्यानंतर ‘अवतार 2’ बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचण्याची शक्यता आहे.
रविवारी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ने ४६ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.
शनिवारीही ४५ कोटींहून अधिक गल्ला जमवला. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांची कमाई १३३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यातही केवळ तिकिटांद्वारे झालेल्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास ‘अवतार २’ने पहिल्या दोन दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला.
बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्टनुसार, रविवारचं चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन पहिल्या वीकेंडला १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. जगभरातील कमाईचा हाच आकडा जवळपास ४५० दशलक्ष डॉलर्सच्या जवळ गेला आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा जगभरातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक आहे.
हॉलिवूड चित्रपटांची भारतातील ओपनिंग कमाई-
डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस – २७.५० कोटी रुपये
ॲव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर- ३१.३० कोटी रुपये
स्पायडरमॅन: नो वे होम – ३२.६७ कोटी रुपये
अवतार: द वे ऑफ वॉटर- ३८ कोटी रुपये
ॲव्हेंजर्स: एंड गेम- ५३.१० कोटी रुपये
Hollywood Film Avtar 2 Record Break Collection
Movie Box Office