इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री किम कार्दशियन आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. किमने गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता याचा निकाल लागला असून दोघेही कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. दोघांनाही मुलांची जॉइंट कस्टडी मिळाली आहे. याबरोबरच कोर्टाने कान्ये वेस्ट किमला महिन्याकाठी किती रक्कम अर्थात पोटगी देईल, याचेही आदेशही दिले आहेत. किम आणि कान्ये यांचं लग्न ९ वर्षे टिकलं.
मार्च २०२२ मध्ये किमने आपण सिंगल असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच तिने तिच्या नावातून ‘वेस्ट’ही काढून टाकलं होतं. यानंतर दोघांमध्ये संपत्तीचे विभाजन आणि मुलांचा ताबा यावरून वाद निर्माण झाला. नुकताच हा वाद न्यायालयाने निकाली काढला. न्यायालयाच्या आदेशानुसार, मुलांसंबंधातील मोठे निर्णय घेताना परस्परांशी संवाद ठेवणे गरजेचे आहे. तसेच मुलांची सुरक्षा, शाळा आणि कॉलेजचा खर्च या दोघांनाही करावा लागेल, असे ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट यांना चार मुलं आहेत. त्यांची मोठी मुलगी नॉर्थ ही ९ वर्षांची आहे. ६ वर्षांचा मुलगा सेंट, ४ वर्षांचा शिकागो आणि ३ वर्षांचा मुलगा सालम अशी त्यांची नावे आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, मुलं जास्त वेळ किमबरोबर राहणार आहेत. तसेच कान्ये वेस्टला मुलांच्या खर्चासाठी महिन्याला २ लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे तब्बल १.६५ कोटी रुपये द्यावे लागतील. त्यामुळे हॉलीवूमधील हा सर्वात महागडा घटस्फोट आहे.
वैयक्तिक आयुष्यात अशा घडामोडी घडत असतानाच सध्या कान्ये वेस्ट नवीन अडचणीत सापडला आहे. स्पोर्ट्सवेअर कंपनी आदिदासने रॅपरविरोधात चौकशी सुरू केली आहे. कंपनीच्या एका सदस्याने वेस्टला एक निनावी पत्र लिहून तो मीटिंग दरम्यान लोकांना अडल्ट कंटेंट दाखवायचा, असा आरोप केला आहे. तसेच त्याने नोकरीच्या मुलाखतीदरम्यान किम कार्दशियनचा एक इंटिमेट फोटोही लोकांना दाखवला होता, असा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर सध्या कान्येचा संघर्ष सुरू आहे.
https://twitter.com/Naija_PR/status/1597859486768635904?s=20&t=YiNsf9-PZbp86IRa7QAJ7Q
Hollywood Costly Divorce Compensation Highest
Entertainment Actress kim kardashian kanye West