इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनयाच्या बळावर हॉलिवूड गाजविणारी अभिनेत्री पामेला अँजरसन हिची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण, यावेळी चर्चेचे कारण काही औरच आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिने हॉलिवूड निर्मात्यासोबत लग्नगाठ बांधली होती. केवळ १२ दिवसांच्या संसारानंतर ते विभक्तही झाले. आहा हाच पूर्वाश्रमीच्या पतीकडून पामेलाला तब्बल ८१ कोटी रुपये मिळणार आहेत.
हॉलिवूड स्टार पामेला अँडरसन नेहमीच चर्चेत असते. तब्बल ५ वेळा लग्न करणाऱ्या पामेला अँडरसनने २०२० मध्ये हॉलिवूड निर्माता जॉन पीटर्ससोबत लग्न केले होते. १२ दिवसांच्या संसारानंतर ते विभक्तही झालेत. आता जॉनने आपल्या इच्छापत्रात पामेलाला मोठी रक्कम देण्याची तजविज केली आहे.
नेहमीच प्रेम करीत राहील
आपल्या इच्छापत्राबाबत ७४ वर्षांच्या जॉन पीटर्सने मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, तो पामेलावर नेहमीच प्रेम करत राहील आणि ही रक्कम तो तिच्यासाठी ठेवत आहे. तिला याची गरज असो किंवा नसो. मी माझ्या इच्छापत्रात तिच्यासाठी १० मिलियन डॉलर ठेवले आहेत. (भारतीय चलनानुसार ही रक्कम ८१ कोटी ५१ लाख रुपये). तिला याबाबत काहीच माहिती नाही. मी पहिल्यांदाच या गोष्टीचा खुलासा केला असल्याचे तो म्हणाला.
१९८० पासून डेटिंग
चर्चेनुसार जॉन आणि पामेला पहिल्यांदा १९८० मध्ये एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर ते कायमच संपर्कात होते. २० जानेवारी २०२० मध्ये या दोघांनी लग्न केल्याची माहिती समोर आली. पामेलाच्या पब्लिसिस्टनेही याची पुष्टी केली होती. मात्र या लग्नाच्या प्रमाणपत्रासाठी कायदेशीर कागदपत्र जमा करण्यात आली नव्हती. १ फेब्रुवारी २०२० रोजी पामेलाने तिने हे पेपरवर्क थांबविल्याची घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांनी पामेलाने ट्विटर पेजवरून जॉनशी कायदेशीररित्या लग्न केले नव्हते असे स्पष्ट केले. त्यानंतर जॉनने मेसेज करून पामेलाशी ब्रेकअप केले होते. पामेलाने पूर्वी टॉम ली बरोबर नंतर किड रॉकसोबत लग्न केले होते, तत्पश्चात रिकी सॉलोमनशी दोन वेळा लग्न केले. जॉन पीटर्सबरोबरचे तिचे पाचवे लग्न होते.
Hollywood Actress Pamela Anderson 81 Crores Will