इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हॉलीवूड अभिनेत्री सारखे दिसण्यासाठी एका तरुणीने चक्क आपल्या शरीरावर तब्बल ४० शस्त्रक्रिया केल्या. परंतु त्यातून तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, याकरिता कोट्यावधी रुपये खर्च केल्यावर अखेर आता ती मूळ रूपात येण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
सिनेमा व फॅशन जगताशी संबंधित सेलिब्रिटी स्वत:ला तरुण, स्लिम-ट्रिम आणि सुंदर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. अनेकदा काही जण दुसऱ्याचे अनुकरण करायला जातात, आणि त्या नादात भलतंच काहीतरी होऊन बसते, ती चूक अनेकांना महागात पडते. हॉलिवूडच्या या मॉडेल सोबत असेच घडले. एका ब्रॅण्डची लोकप्रिय मॉडेल जेनिफर पांप्लोना हिने किम कर्दाशियन प्रमाणे दिसण्यासाठी फार मोठी किंमत मोजली आहे. त्यात तिचा वेळ, पैसा तर वाया गेलाच सोबतच तिच्या चेहऱ्याचे वेगळेच हाल झाले आहेत. जेनिफरने किमसारखे दिसण्यासाठी तब्बल 4 कोटी 77 लाख रुपये खर्च केले परंतु,या सगळ्यात तिचा चेहरा बिघडला.
हॉलिवूड स्टार आणि मॉडेल किम कार्दशियन सौदर्याची चर्चा ही जगभरात आहे. तिच्या चाहत्यांमध्ये केवळ पुरुषच नाही तर असंख्य स्त्रियांचाही समावेश आहे. किमसारखी फिगर व्हावी यासाठी तरुणी काहीही करण्यासाठी तयार असतात. या मॉडेलने किमसारखे दिसण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. एका प्रसिद्ध ब्रँडची मॉडेल जेनिफर पॅम्प्लोना हिने आधी किम कादर्शियनसारखे दिसण्यासाठी तब्बल 600 हजार डॉलर्स खर्च केले होते. आता पुन्हा पहिल्यासारखं दिसण्यासाठी, आपले रुप परत मिळवण्यासाठी तिला 120 हजार डॉलर्स खर्च करावे लागत आहेत.
एका वृत्तानुसार, 29 वर्षीय जेनिफरने किम कार्दशियनसारखं दिसण्यासाठी 12 वर्षांच्या कालावधीत सुमारे 40 कॉस्मेटिक ऑपरेशन्स केल्या होत्या. इतके सगळे करूनही हे सर्व फक्त वरवरचं समाधान देणारं होते, याची जाणीव तिला अखेर झाली. कारण वैयक्तिक आयुष्यात एवढे सगळे करूनसुद्धा मला नागरिक फक्त किम कार्दशियनसारखी दिसणारी म्हणून ओळखायचे, अशी खंत तिने व्यक्त केली.
पॅम्प्लोना 17 वर्षांची असताना तिच्यावर पहिल्यांदा शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी किम कार्दशियनला लोकप्रियता मिळवण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर पॅम्प्लोनाला मोठी सेलिब्रिटीसारखी दिसू लागेल अशा सर्जरी करण्याचं जणू व्यसनच लागले होते. तिने सांगितले की, एखाद्या सुपरमार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करावे त्याप्रमाणे मी माझ्या चेहऱ्यावर फिलर टाकत होते. हे एक व्यसन होते आणि मी प्रसिद्धी, पैसा आणि शस्त्रक्रियेच्या चक्रात अडकत गेले. मी माझ्या सर्व गोष्टींवरून नियंत्रण गमावलं होतं,” अशी कबुली जेनिफरने दिली. अनेव वर्षं या अस्वस्थतेत राहिल्यानंतर आता तिला पुन्हा मूळ रुपात येण्यासाठी ती प्रयत्न करत होती.
आपल्या मूळ रुपात परत जाण्याची सर्जरी मात्र जेनिफरला महागात पडली. कारण ऑपरेशन रुममध्ये मी एक व्यक्ती म्हणून गेले होते आणि बाहेर दुसरीच व्यक्ती बनून पडले”, असं जेनिफर म्हणाली. डिट्रान्झिशन प्रक्रियेनंतर जेनिफरला अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जावे लागले. तीन दिवस तिच्या गालातून रक्तस्त्राव होऊ लागला होता. आपले आयुष्य गमावतोय की काय? अशी भीती तिला जाणवू लागली. सुदैवाने, सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. मात्र अजूनही सूज आणि जखमा दिसत असल्याने सर्जरीचा अंतिम परिणाम कसा दिसेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही संपूर्ण प्रक्रिया वेदनादायी असेल याची आधीच तिला कल्पना असल्याचे जेनिफरने स्पष्ट केले.
Hollywood Actress 40 Surgery for de transition look