इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हॉलिवूड स्टार जॉनी डेपने अलीकडेच त्याची पत्नी एम्बर हर्डविरुद्ध मानहानीचा खटला जिंकला आहे. एवढेच नाही तर या विजयानंतर जॉनीने मित्रांसोबत करी डिनर करून विजय साजरा केला आणि यामध्ये त्याने तब्बल 48.1 लाख रुपये खर्च केले. रिपोर्टनुसार, रविवारी संध्याकाळी इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये एका सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते.
डेपने वाराणसी रेस्टॉरंटमध्ये भारतीय जेवण, कॉकटेल आणि गुलाब शॅम्पेनचा आनंद घेतला. वाराणसी रेस्टॉरंट हे बर्मिंघममधील सर्वात मोठे भारतीय रेस्टॉरंट असल्याचे सांगितले जाते. खरं तर, त्याच्या सुरक्षा पथकाने आधी तपासले होते की तो अशा ठिकाणी साजरा करेल जिथे 400 लोक येऊ शकतील. अशा ठिकाणी जॉनीच्या प्रायव्हसीची काळजी घेतली जावी, अशी त्यांची इच्छा होती.
वाराणसीतील रेस्टॉरंटच्या संचालकाने सांगितले की, रविवारी आम्हाला एक फोन आला होता, ज्यामध्ये सांगण्यात आले होते की जॉनी डेप आमच्या रेस्टॉरंटमध्ये काही लोकांसोबत जेवायला येणार आहे. मला सुरुवातीला धक्का बसला होता. मला वाटले कोणीतरी मस्करी करत आहे. मात्र त्यानंतर त्याच्या सुरक्षा पथकाने येऊन रेस्टॉरंटची तपासणी केली. मग आम्ही त्यांना पूर्ण जागा दिली जेणेकरून ते आरामात जेवण करू शकतील.
जॉनी डेप तिथे जवळपास 3 तास थांबला आणि तिथे त्याने मॅनेजरचे कुटुंब आणि मित्रांची भेट घेतली आणि त्यानंतर तो निघून गेला. मॅनेजरने सांगितले की, यादरम्यान जॉनी खूप आनंदी होता आणि तो सर्वांशी छान बोलला. विशेष म्हणजे, जॉनने रेस्टॉरंटच्या वेटरला तब्बल ४८ लाख रुपयांची टीप दिल्याचे सांगितले जात आहे.
जॉनी आणि अंबरबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही 2009 मध्ये द रम डायरी या चित्रपटादरम्यान भेटले होते आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. दोघांनी 2015 मध्ये लग्न केले. पण दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. यानंतर 2016 मध्ये अंबरने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तिने जॉनीवर अभिनेत्याने आपले शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला. डेपने आरोप फेटाळले. 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर जॉनीने अंबरविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला. 2018 मध्ये जॉनीचे नाव न घेता अंबरने सांगितले की ती घरगुती हिंसाचाराची शिकार झाली होती.