इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्यात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. जॉनी डेपला माजी पत्नी अंबर हर्डकडून तब्बल 15 दशलक्ष डॉलर्स (११६ कोटी ३३ लाख रुपये) इतकी मोठी रक्कम भरपाई म्हणून देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
मानहानीच्या प्रकरणात माजी जोडप्याने एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप केले होते. माजी पत्नीला तिच्या नवऱ्याला एवढी मोठी रक्कम द्यावी लागेल अशी जगातील ही कदाचित पहिलीच घटना आहे. व्हर्जिनियातील फेअरफॅक्स काउंटी सर्किट कोर्टात हा निर्णय देण्यात आला. हर्डने दावा केला की डेपने लग्नाआधी आणि नंतर तिचा गैरवापर केला. हर्डचे आरोप खोटे असल्याचे सांगून जॉनी डेपने त्याच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला हर्डने वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख लिहून तिच्या माजी पतीवर गंभीर आरोप केले होते. जॉनी डेप याबाबत न्यायालयात गेले असता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत हा निर्णय दिला.
ज्युरीने हर्डची बाजू देखील ऐकली, आणि सांगितले की, माजी पत्नीने डेपला $15 दशलक्ष नुकसान भरपाई द्यावी, तर हर्डला $2 दशलक्ष मिळावे. म्हणजेच या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने जॉनी डेपलाही दोषी ठरवले आहे. हा खटला अमेरिकेत किती गाजला होता, याचा अंदाज या खटल्याचं थेट प्रक्षेपण टीव्हीवर दाखवण्यात आला त्यावरून करता येतो. आता जॉनी डेपच्या बाजूने निकाल लागल्याने पायरेट्स ऑफ द कॅरिबियन स्टार ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’ आपली गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याच्या आशेवर आहे. कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करताना जॉनी डेप म्हणाला की, या निर्णयामुळे माझे आयुष्य परतले आहे. तसेच मी न्यायालयाचा खूप आभारी आहे. सत्य बाहेर यावे हाच गुन्हा दाखल करण्यामागचा माझा हेतू असल्याचेही ते म्हणाले.
असे होते अंबर हर्डचे आरोप
हॉलिवूड चित्रपट ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ चा अभिनेता जॉनी डेपवर त्याची माजी पत्नी अंबर हर्ड हिने दारूच्या बाटलीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. बेदम मारहाण करुन नाक तोडल्याचेही अंबरने म्हटले होते. अंबरने सांगितले होते की, 2015 च्या सुरुवातीस त्यांच्या लग्नानंतर सुमारे एक महिन्याने ऑस्ट्रेलियात डेपला भेट दिली होती. तेव्हा तो पायरेट्स ऑफ द कॅरिबियन 5 चे शूटिंग करत होता. डेप राहत असलेल्या घरी त्यांच्या पहिल्या संध्याकाळी डिनरचे नियोजन केले होते. परंतु त्यांच्यात वाद झाला.
डेप त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. तिला फ्रीजच्या दिशेने ढकलून तिचा गळा पकडला. तसेच त्याने बाटल्या फेकल्या आणि त्या आजूबाजूला पसरल्या. डेपने तिचा नाईटगाऊन फाडून तिला नग्न केले. तसेच तिला एका टेबलावर टेकवले आणि दारुची एक बाटली तिच्या योनीमध्ये (प्रायव्हेट पार्ट) घातली. तसेच तो बाटली पुन्हा पुन्हा प्रायव्हेट पार्टमध्ये टाकत राहिला. काही महिन्यांनंतर डेपने तिच्या लॉस एंजेलिसच्या घरी तिचे नाक तोडले. तसेच केस ओढून तेही तोडले.