इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्यात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात कोर्टाने मोठा निकाल दिला असून जॉनी डेपला माजी पत्नी अंबर हर्डकडून 15 दशलक्ष डॉलर्स इतकी मोठी रक्कम दिली जाईल. मानहानीच्या प्रकरणात माजी जोडप्याने एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप केले होते. माजी पत्नीला तिच्या नवऱ्याला एवढी मोठी रक्कम द्यावी लागेल अशी जगातील ही कदाचित पहिलीच घटना आहे.
पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ चित्रपट अभिनेता जॉनी डेप त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्डच्या विरोधात जॉनीने पुन्हा एकदा कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल होता, त्यामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. दरम्यान, हा मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. यासगळ्यात जॉनी डेप आणि त्याची वकिल कॅमिल वास्क्वेझ हे दोघेही आता रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. यावर आता कॅमिलने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
विशेष म्हणजे कॅमिल ही कॅलिफोर्नियास्थित वकिल असून जॉनी डेपच्या खटल्यामुळे ती प्रकाशझोतात आली. तिच्या प्रश्नांमुळे आणि कोर्टातील तिच्या आत्मविश्वासामुळे सोशल मीडियावर ती अनेकांची चाहती झाली. जॉनीचा खटला जिंकल्यानंतर तिचे प्रमोशनही करण्यात आले आहे. याबाबत एका मुलाखतीत कॅमिल म्हणाली की, एखाद्या महिलेने चांगले काम उत्तम केल्यावर अशा चर्चा होतातच असतात. पण हे खूप निराशाजनक आहे. जॉनी हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि गेल्या साडेचार वर्षांपासून मी त्याच्यासाठी काम करते आहे. मी स्वत: एका रिलेशनशिपमध्ये आहे आणि माझ्या बॉयफ्रेंडसोबत आनंदी आहे.
एखाद्या वकिलाने त्याच्या क्लाएंटला डेट करणे हे चुकीचे आहे आणि त्याबाबत कोणीही अशा अफवा पसरवणे हे देखील चुकीचे आणि वाईट आहे. त्यामुळे हे एखाद्या स्त्रीचा दर्जा कमी केल्यासारखे आहे. कदाचित माझ्या कामामुळे मला अशा गोष्टींना सामोरे जावे लागत असावे. त्यामुळे या चर्चा जेव्हा होऊ लागल्या तेव्हा मला त्याच फारसे आश्चर्य वाटत नाही, आणि काही फरकही पडत नाही.
जॉनीशी झालेल्या जवळीकबद्दल कॅमिलपुढे म्हणाली की, जॉनी त्याला न्याय मिळण्यासाठी तिथे लढत होता. त्याच्याविरोधात तथ्यहीन आरोप होत असताना त्या व्यक्तीने दररोज कोर्टात येऊन बसलेल पाहून मला प्रचंड दु:ख होत असे. अशा व्यक्तीची मी माझ्या परीने पूर्ण मदत केली. कोर्टात असताना मी त्याला त्याला थोडा आधार देण्याचा प्रयत्न केला. मग त्याचा हात माझ्या हातात घेऊन का होईना. आम्ही त्याला न्याय मिळवून देऊ हे आश्वासन मी जॉनीला देण्याचा प्रयत्न केला, असेही तिने स्पष्ट केले.