नाशिक – होळी, धुलीवंदनसह रंगपंचमी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पंचवटी पोलिसांतर्फे हद्दीत रुट मार्च काढण्यात आला. तसेच दंगा काबू योजनेची रंगीत तालीमही घेण्यात आली. पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त अमोल तांबे यांच्या आदेशान्वये आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही उपाय योजना करावी. सहायक आयुक्त मधुकर गावीत, वरीष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, निरीक्षक युवराज पतकी, आडगाव पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्यासह पंचवटी, आडगाव, म्हसरुळ पोलिस ठाण्याचे सात अधिकारी, ५२ अंमलदार तसेच पोलिस वाहनांचा रुट मार्चमध्ये सहभाग होता. पंचवटी कारंजा-मालवीय चौक-विनोद गारमेंट-शनी चौक-गोरेराम मंदिर-कपालेश्वर-मालेगाव स्ॅण्ड-इंद्रकुंड-पंचवटी या मार्गाने रुट मार्च काढण्यात आला.
रंगीत तालीम यशस्वी…
पंचवटी कारंजा परिसरात बँनर लावण्यावरून दोन गटात हाणामारी सुरु असल्याचा संदेश नियंत्रण कक्षाने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना दिला. त्यानंतर डॉ. कोल्हे यांनी पोलिस पथकासह अत्यंत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचून पोलिस कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.