इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे पोहोचून जनतेला संबोधित केले. शहा यांचे भाषण सुरू असतानाच जवळच्या मशिदीत अजान सुरू झाली. ही बाब लक्षात घेत शहांनी त्यांचे भाषण थांबवले. अजान संपताच शाह यांनी पुन्हा त्यांचे भाषण सुरू केले. शहा हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर जम्मू-काश्मीरला पोहोचले आहेत. मंगळवारी ते राजौरी येथे एका कार्यक्रमाला गेले होते.
शाह यांच्या सभेला बारामुल्लामध्ये अनेक नागरिक जमले. खुद्द गृहमंत्रीही व्यासपीठावरून पूर्ण उत्साहात आपले भाषण देत होते, पण त्याच दरम्यान त्यांना जवळच्या मशिदीत अजान सुरू झाल्याचे कळले. ही बातमी कळताच त्यांनी आपलं बोलणं मध्येच थांबवलं. ते म्हणाले ‘मला नुकतेच पत्र मिळाले की मशिदीत नमाजाची वेळ झाली आहे, आता ती संपली आहे.’ काही वेळाने त्यांनी पुन्हा मंचावरून जनतेला विचारणा करून बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी विचारले, ‘पुन्हा सुरू करू का, आणि जोरात बोलू का’
जम्मू-काश्मीरमध्ये शाह यांच्या सुरक्षेसाठी स्टेजवर बुलेट प्रूफ काच लावण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बारामुल्लामध्ये भाषण सुरू करण्यापूर्वीच त्यांनी काच काढली होती. तथापि, त्यांनी प्रथमच असे केलेले नाही. याआधीही त्यांनी स्टेजवरून बुलेट प्रूफ काच काढली आहे.
शाह यांनी बुधवारी सांगितले की, ‘मोदीजींनी ५ ऑगस्टनंतर जम्मू-काश्मीरमध्ये जमहूरियतला गावापर्यंत नेण्याचे काम केले आहे. आज खोऱ्यात आणि जम्मू-काश्मीरमध्ये ३० हजारांहून अधिक लोक पंचायत, तहसील पंचायतींचे नेतृत्व करत आहेत. “पूर्वी काश्मीरमध्ये जमहूरियतची व्याख्या तीन कुटुंबे, ८७ आमदार आणि ६ खासदार अशी होती,” ते म्हणाले.
Massive gathering at a public rally in Baramula, J&K…Watch my address! https://t.co/7SG6JwrBAD
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) October 5, 2022
HM Amit Shah Stop Speech While Ajan
Jammu Kashmir