नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठी माझ्यावर सीबीआयचा दबाव होता, असा खळबळजनक दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
काँग्रेसच्या नेतृत्त्वातील युपीए सरकारने गुजरातमधील एका कथित चकमकप्रकरणी (फेक एन्काऊंटर) तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अकडवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता. तेव्हा मी राज्याचा गृहमंत्री होता. एका कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीदरम्यान अमित शहा यांनी असा गौप्यस्फोट केला.
सध्याचे पंतप्रधान आणि तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर सीबीआयच्या माध्यमातून दबाव टाकण्यात येत होता. मात्र, भाजपने कुठेही गोंधळ घातला नाही, किंवा त्याबाबत संभ्रम निर्माण केला नाही, असे शहा यांनी म्हटले. तसेच, राहुल गांधी हे एकमेव नेते नाहीत, ज्यांना न्यायालयाने शिक्षा दिली आहे किंवा ज्यांची खासदारकी गेली आहे, असेही ते म्हणाले.
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोष देण्यापेक्षा आपण दोषी नाहीत, याबाबत वरच्या कोर्टात अपील करायला हवे. मात्र, त्यांनी अद्यापही तसं अपील केलं नाही, हे खूप अहंकारी आहेत, असेही अमित शहा यांनी म्हटले.
विरोधी पक्षांची केंद्रावर टीका
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार विरोधी पक्षांद्वारे करण्यात येत आहे. केंद्र सरकार ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांद्वारे विरोधकांवर कारवाई करत आहे. त्यांना संपविण्याचा प्रकार सुरू असल्याची ओरड सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला दावा तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवण्यास पुरेसे ठरले आहे.
HM Amit Shah on Gujrat Encounter Statement