रविवार, सप्टेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रजेवर गेलेले एकनाथ शिंदे तातडीने नागपूरकडे.. अमित शहा दुसऱ्यांदा दौऱ्यावर… फडणवीसांचीही उपस्थिती.. काहीतरी घडतंय?

by Gautam Sancheti
एप्रिल 26, 2023 | 1:22 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Shinde Shah Fadanvis e1682495513912

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडी आणि विविध हालचालींना खुपच वेग आला आहे. तीन दिवसांच्या रजेवर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा तालुक्यातील मूळगावी आहेत. मात्र, आता ते अचानक नागपूरकडे जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज सायंकाळी नागपुरात दाखल होणार आहेत. शाह यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे नागपूरला जाणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

शहरातील जामठा येथे राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय) साकारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. हा समारंभ गुरुवार, २७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान केंद्राद्वारे एनसीआय साकारण्यात आले आहे. याद्वारे कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. राज्यासह परराज्यातील अनेक रुग्ण येथे उपचार घेऊ शकणार आहेत. या सोहळ्यासाठी गृहमंत्री अमित शाह हे आज सायंकाळीच नागपुरात दाखल होणार आहेत. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.

अमित शाह हे नागपूर दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, शिंदे सध्या ३ दिवसाच्या रजेवर सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी गेले आहेत. आता शाह नागपूरला येणार असल्याने ते नागपूरला जाणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

यावेळी गृहमंत्री शाह, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जाते. राज्यात मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा आहे. अशातच आता हे तिन्ही नेते भेटणार असल्याने त्यात काही रणनिती ठरणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

HM Amit Shah Nagpur Visit Cm Shinde DYCM Fadnavis

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ब्रिटनमध्ये साकारणार पहिले जगन्नाथ मंदिर… या अब्जाधीशाने दिली तब्बल २५० कोटींची देणगी… आजवरचे सर्वाधिक दान

Next Post

मुख्यमंत्री बदलाबाबत सध्या हालचाली सुरू आहेत का? शरद पवार म्हणाले…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
संमिश्र वार्ता

लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वीच मुख्य प्रवेशद्वाराजवळ अपघात…दोन चिमुकल्यांना चिरडून वाहनचालक फरार

सप्टेंबर 6, 2025
daru 1
संमिश्र वार्ता

परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी मोठी कारवाई…१ कोटी ५६ लाखाचा मुद्देमाल जप्त

सप्टेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना वाहन खरेदीचा योग, शनिवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 6, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने लाचखोरी प्रकरणात एलआयसीच्या या अधिका-याला दिली ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सप्टेंबर 5, 2025
IMG 20250904 WA0382 1
संमिश्र वार्ता

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव….परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

सप्टेंबर 5, 2025
CM
संमिश्र वार्ता

आता राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ …१५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट

सप्टेंबर 5, 2025
A90 LE KV e1757035342319
संमिश्र वार्ता

आयफोनसारख्या डिझाईनसह हा फोन लाँच….६,३९९ रुपये आहे किंमत

सप्टेंबर 5, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना आता इतकी मुदत…

सप्टेंबर 5, 2025
Next Post
sharad pawar 5

मुख्यमंत्री बदलाबाबत सध्या हालचाली सुरू आहेत का? शरद पवार म्हणाले…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011