नागपूर– महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका… खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके माजलेत बोके… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… कुणी उद्योग घ्या, कुणी सबसिडी घ्या तुम्ही खोके घ्या… अशा घोषणा देत आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आज हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस असून गायरान जमीन आणि उद्योगमंत्र्यांनी केलेल्या अजब उद्योगाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली नववा दिवसही आमदारांनी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात गाजवून सोडला.