नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर… गद्दार सत्तार राजीनामा द्या राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा…संत्र्याला भाव, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… आटली बाटली फुटली, भूखंड खाताना लाज नाही वाटली… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. हिवाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी आजही लावून धरल्याचे पहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Maharashtra Assembly Winter Session Nagpur
Opposition Leader Slogans Minister Abdul Sattar