न्यू मॅक्सिको – अमेरिकेमधील न्यू मॅक्सिको शहराचे नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरात नोंदविले गेले आहे. ब्रिटिश अब्जाधीश आणि व्हर्जिन समुहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅस्नन, भारतीय वंशाच्या सिरिशा बांदला यांच्यासह पाच सहकारी व्हर्जिन गॅलेस्टिकच्या व्हीएसएस युनिटी या विमानातून अवकाश कक्षेजवळ जाऊन भारतीय वेळेनुसार प्रक्षेपण केंद्रात रात्री ९.१२ वाजता यशस्वीपणे परतले. यानिमित्ताने मानवी इतिहासात महत्त्वाची घटना घडली आहे. अंतराळ पर्यटनाची ही रंगीत तालिम यशस्वी झाल्याने आगामी काळात अंतराळ पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
७१ वर्षांचे ब्रॅस्नन आपल्या पाच सहकार्यांसोबत भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजून १० मिनिटांनी अंतराळाच्या ऐतिहासिक प्रवासासाठी अवकाशात झेपावले. हा प्रवास एका तासाचाच असला तरी महत्त्वाचा मानला जात आहे. उड्डाणाच्या वेळी ५०० हून अधिक लोकांनी ब्रॅस्नन आणि त्याच्या सहकार्यांना यशस्वी प्रवासासाठी सलामी दिली. त्यामध्ये ब्रॅस्नन यांची पत्नी, मुले, नातवंडेसुद्धा सहभागी झाले होते.
गुरुत्वाकर्षणाचा अनुभव
योजनेनुसार ब्रॅस्नन आणि त्यांच्या सहकार्यांचे विमान मूळ प्रक्षेपक व्हाइट नाइट-२ पासून १३ किमीच्या उंचीवर वेगळे झाले. त्यानंतर व्हीव्हीएस युनिटीने इंजिन सुरू करून ७० किमी उंचीपर्यंतचा प्रवास केला. त्यानंतर हे विमान पृथ्वीचे वातारवण सोडून ८८ किमीच्या उंचीवर जाऊन पोहोचले. अवकाशात प्रवेश करताच सर्वांनी गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला. त्यानंतर विमान अवकाश केंद्राकडे परतले.
नऊ दिवसांनंतर आणखी एक उड्डाण
ब्रॅस्नन यांच्यानंतर आणखी एक अब्जाधिश उद्योगपती जेफ बेजोस हेसुद्धा आपल्या ब्लू ओरिजिन या कंपनीच्या न्यू शेफर्ड विमानातून २० जुलैला अवकाशयानाचा प्रवास करणार आहेत. पश्चिम टेक्सास येथील अवकाश केंद्रातून बेजोस उड्डाण करणार आहे. ५२ वर्षांपूर्वी याच दिवशी अपोलो ११ हे यान चंद्रावर उतरले होते.
ब्रॅस्नन यांचे पूर्वज तामिळनाडूचे
उद्योजक रिचर्ड ब्रॅस्नन यांचे भारताशी वेगळेच नाते आहे. त्यांचे पूर्वज तामिळनाडूनमधील कडलोर येथील होते. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या एका डीएनए चाचणीत त्यांच्या वडिलांची पणजी भारतीय मूळच्या होत्या, असा खुलासा झाला होता. १७९३ मध्ये विवाह करून त्या ब्रॅस्नन कुटुंबात आल्या होत्या. त्यांच्या माहेरचे नातेवाईक आजही कडलोर येथे राहतात. त्यामुळे ब्रॅस्नन स्वतःला भारतीय मूळ असलेले उद्योजक मानतात. विशेष म्हणजे मुंबई-पुणे हायपरलूप जाळे तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्हर्जिन कंपनीचे मालक ब्रॅस्नन यांच्यासोबत आधीच करार केलेला आहे.
https://twitter.com/richardbranson/status/1414289206717865984