नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. वडिलांनंतर भारताच्या इतिहासात प्रथमच मुलानेही सरन्यायाधीश पद भूषविण्याचा योग आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चंद्रचूड यांना आज शपथ दिली.
निवृत्त सरन्यायाधीश उदय लळित यांची त्यांनी जागा घेतली. न्यायमूर्ती चंद्रचूड ही त्यांच्या कुटुंबातील दुसरी पिढी आहे जी न्यायालयीन व्यवस्थेच्या शीर्षस्थानी पोहोचली आहे. त्यांच्या आधी त्यांचे वडील यशवंत चंद्रचूड हे देखील देशाचे सरन्यायाधीश होते. धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या बरोबर ४४ वर्षांनंतर हा मान मिळवला आहे. त्यांचा कार्यकाळ सुमारे दोन वर्षांचा असेल आणि ते १० नोव्हेंबर २०२४ रोजी निवृत्त होतील. ११ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या धनंजय चंद्रचूड यांनी १९९८ मध्ये देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केले.
धनंजय चंद्रचूड यांनी २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते मुंबई उच्च न्यायालयाशी देखील संबंधित आहेत आणि २०१६ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आले होते. चंद्रचूडचे वडील वायव्ही चंद्रचूड यांच्या नावावरही मोठा विक्रम आहे. वायव्ही चंद्रचूड यांनी २२ फेब्रुवारी १९७८ रोजी मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ११ जुलै १९८५ पर्यंत ते या पदावर राहिले. ते देशातील सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश राहिले होते. आता त्यांचा मुलगा डीवाय चंद्रचूड यांनाही दोन वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे. अनेकदा सरन्यायाधीशांना त्याहूनही कमी कार्यकाळ मिळतो. निवृत्त झालेल्या न्यायमूर्ती उदय लळित यांचा कार्यकाळ केवळ ७४ दिवसांचा होता.
भारतीय राज्यघटनेशी संबंधित महत्त्वाच्या बाबींपासून ते अनेक फौजदारी आणि दिवाणी खटल्यांमध्ये धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय दिले आहेत, ज्यांनी देशाचे चित्र बदलण्यात मोलाचे योगदान दिले आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी त्यांच्या वडिलांचे दोन निर्णय उलटवले आहेत, ज्यासाठी त्यांची चर्चा झाली आहे. अयोध्या जन्मभूमी वाद, गोपनीयतेचा अधिकार, कलम ३७७ आणि आधार योजनेची वैधता यासह अनेक महत्त्वाची प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात न्यायमूर्ती चंद्रचूड हे निकाल देणार्या खंडपीठाचा भाग आहेत. अलीकडेच अविवाहित महिलांना ६ महिन्यांपर्यंतच्या गर्भधारणेचा गर्भपात करण्याची परवानगी देणाऱ्या खंडपीठाचाही तो भाग होता.
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1590200059081072642?s=20&t=y8Im8J35Re263T-zieyxTQ
Historic Supreme Court CJI Dhananjay Chandrachud