इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरात अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये मूळ गाण्याच्या श्रेणीत भारतीय चित्रपट आरआरआर मधील नाटू नाटू या गाण्याला पुरस्कार जाहीर झाला आहे. ही बाब अतिशय ऐतिहासिक आहे. त्यामुळे देशभरातून यासंदर्भात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार या गाण्याला प्राप्त झाल्याने मोठा इतिहास घडला आहे.
ऑस्कर 2023चे पुपस्कार आज देण्यात येत आहेत. रिझ अहमद आणि अॅलिसन विल्यम्स यांनी त्यांच्या अकादमी पुरस्कार नामांकनांची घोषणा केली. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीच्या पुरस्कारांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, भारतासाठी ही आनंदाची बातमी आली आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर, RRRने आता ऑस्कर 2023 सुद्धा जिंकला आहे. चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले. आणि आता हा पुरस्कारही मिळाला आहे.
https://twitter.com/RRRMovie/status/1635121903118733315?s=20
दक्षिण भारतीय चित्रपटांचा नंबर वन दिग्दर्शक मानला जाणारा एसएस राजामौली यांचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ चित्रपटाने इतिहास रचला आहे. देशासाठी पहिला गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकल्यानंतर ‘RRR’ने असा आणखी एक टप्पा गाठला आहे, ज्याने सर्वांचीच छाती रुंद केली आहे. खरं तर, आज ज्युनियर एनटीआर आणि राम चरण स्टारर या चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ या गाण्याला ऑस्कर 2023 गाण्याच्या श्रेणीत मिळाला आहे. ही बातमी येताच राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर ‘RRR’ चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन करत आहेत. हा केवळ ‘RRR’ संघासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे.
https://twitter.com/RRRMovie/status/1635114639775399937?s=20
‘RRR’मध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका करणारा अभिनेता राम चरणच्या वडिलांनाही ही बातमी ऐकून धक्का बसला आहे. त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे तसेच एसएस राजामौली आणि एमएम कीरावानी यांचे अभिनंदन केले आहे. चिरंजीवीने ट्विटमध्ये लिहिले की, ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर नामांकन मिळाल्याबद्दल गुरू आणि दूरदर्शी एसएस राजामौली, एमएम कीरावानी आणि नातू नातू यांच्या पाठीमागील संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन.’
https://twitter.com/TheAcademy/status/1635118655288614918?s=20
Historic RRR Movie Natu Natu Song Win Oscar 2023 Award