गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ऐतिहासिक! अवघ्या काही सेकंदातच असा कोसळला ३२ मजली ट्विन टॉवर (बघा थरारक व्हिडिओ)

ऑगस्ट 29, 2022 | 12:13 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Twin Tower e1661576791632

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज एक ऐतिहासिक घटना घडली आहे. तब्बल ३२ मजली ट्विन टॉवर अवघ्या काही सेकंदातच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ही इमारत कोसळताच धुळीचे प्रचंड लोट उटले आहेत. या घटनेकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले होते. जगात प्रथमच एवढ्या मोठ्या इमारतीचे पाडकाम करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली.

दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी विध्वंस तज्ञ चेतन दत्ता ब्लॅक बॉक्सला जोडलेले हँडल १० वेळा फिरवला. यानंतर त्यात बसवलेला लाल बल्ब लुकलुकायला सुरुवात झाली. त्यामुळे चार्जर स्फोटासाठी तयार झाले. यानंतर दत्ता यांनी हिरवे बटण दाबले. यामुळे चार डिटोनेटरपर्यंत विद्युत लहरी गेल्या. त्याक्षणी अवघ्या ९ ते १२ सेकंदात इमारतीत एकामागून एक महाकाय स्फोट झाले. स्फोटांमुळे ३२ मजली इमारत अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इमारतीचे रुपांतर मोठ्या ढिगाऱ्यामध्ये झाले. अवघ्या एकाच मिनिटात घडलेल्या या घटनेची इतिहासात नोंद झाली. देशातील सर्वात उंच इमारत पाडण्याचा पहिला आणि मोठा विक्रम नोएडाच्या नावावर नोंदवला गेला.

सुपरटेक एमराल्ड सोसायटीचे रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष उदयभान सिंग तेवतिया म्हणतात की, इमारत पाडल्यामुळे अनेक चिंता आहेत, पण बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारती पाडल्या जात आहेत आणि आमचा दहा वर्षांचा संघर्ष आज संपुष्टात आला आहे. याचा मनस्वी आनंद आहे. हे टॉवर पाडण्याचा पहिला आदेश उच्च न्यायालयाने एप्रिल २०१४ मध्ये दिला होता. त्यानंतर वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आणि आता दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर हा टॉवर पाडण्यात आला.

https://twitter.com/ANI/status/1563814230070947840?s=20&t=EIvkTZuT0PIEYEdokZ34bQ

इमारत कोसळल्यानंतर प्रचंड प्रमाणात धूर आणि धूळ बाहेर आली. त्याचा अंदाज कुणालाही आला नव्हता. त्याचा सर्वात वाईट परिणाम लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर होणार आहे. या समस्येसाठी तुमची योजना काय आहे? असे नोएडा प्राधिकरणाला विचारले असता त्यांनी कुठलेही ठोस उत्तर दिलेले नाही. त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय या घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

नोएडाच्या सेक्टर ९३ मधील सुपरटेक एमराल्ड सोसायटीमध्ये भ्रष्टाचाराच्या पायावर बांधलेले ट्विन टॉवर आज पाडण्यात आले. हे टॉवर पाडण्याची अतिशय जय्यत तयारी करण्यात आली होती. एमराल्ड कोर्ट आणि एटीएस ग्रीन सोसायटीच्या सर्व १३९६ फ्लॅट पूर्णपणे रिकामे करण्यात आले. फ्लॅटमध्ये राहणारे सर्व रहिवासी आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी निघून गेले. त्यापैकी काही जण आपल्या मित्र-मैत्रिणींकडे, तर काही जण यात्रेला आणि हिलस्टेशनला गेले आहेत. तर काहींनी हॉटेलमध्ये खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. काही लोकांच्या राहण्यासाठी जवळपासच्या इतर सोसायट्यांमध्येही व्यवस्था करण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण परिसर आपल्या सुरक्षेखाली घेतला असून टॉवर्सभोवती इतरांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, टॉवर परिसरात अर्धा तास विमानांच्या फेऱ्यांनाही मज्जाव करण्यात आला होता.

Historic Noida Twin Tower Demolished Shocking Video
Historic Green Button Few Second Procedure Uttar Pradesh

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

थोड्याच वेळात अभूतपूर्व घटना..!! केवळ एक हिरवे बटण दाबताच होणार धडाsssम…. ३२ मजली इमारत कोसळणार!

Next Post

येवल्यातील पेट्रोल पंपावर बर्निंग बुलेटचा थरार सीसीटीव्हीत कैद (बघा व्हिडीओ)

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20220828 WA0017 e1661678829854

येवल्यातील पेट्रोल पंपावर बर्निंग बुलेटचा थरार सीसीटीव्हीत कैद (बघा व्हिडीओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011