नवी दिल्ली – भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना अनेक गड, किल्ले आढळून येतात. या गड किल्ल्यावर त्या काळातील राजांच्या शौर्य कथांचा इतिहास नोंदविलेला आहे. त्यातील अनेक किल्ले हे ऐतिहासिक व अद्भुत कथांचा वारसा सांगणारी आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ नजिक असलेल्या रायसेन या किल्ल्याशी संबंधित अशी एक अतिशय गूढ कथा आहे.
भारतात अनेक प्रांतात विविध राजांचे असे अनेक किल्ले असून त्यामध्ये एक अनोखी कथा आहे. सदर किल्ले भारताचा ऐतिहासिक वारसा अभिमान असल्याचे म्हटले जाते. तसेच अशा काही रहस्यमय गोष्टी येथे आहेत. त्या लोकांना विचार करण्यास भाग पाडतात. असाच एक किल्ला भोपाळ येथे असून या मागील एक अतिशय आश्चर्यकारक ऐतिहासिक कथा आहे. मध्य भारतात अनेक राजांनी राज्य केले, त्यापैकी एक शेरशाह सूरी होता. तथापि, रायसेन हा किल्ला जिंकण्यासाठी चार महिने वेढा घालूनही तो किल्ला जिंकू शकला नाही. कारण त्यावेळी या किल्ल्यावर राजा पुराणमल राजाचे राज्य होते.
इतिहास अभ्यासक असे म्हणतात की, शेरशाह सूरीने हा किल्ला जिंकण्यासाठी तांब्याची नाणी वितळवून तोफ बनवल्या होत्या. त्यामुळे तो किल्ला जिंकणे भाग्यवान ठरणार होते. तथापि सुमारे चार महिने प्रयत्न करूनही किल्ला जिंकता येत नसल्याने शेरशहाने सन १५४३ मध्ये तो जिंकण्यासाठी फसवणुकीचा मार्ग स्वीकारला. त्यावेळी या किल्ल्यावर राजा पुराणमल हा आपली पत्नी राणी रत्नावली समवेत राहत होता. शेरशहाकडून आपली फसवणूक झाल्याचे कळताच राजा पुराणमल याने राणी रत्नावलीला शत्रूंपासून वाचविण्यासाठी तिचे मुंडके उडविले होते.
या किल्ल्याशी संबंधित आणखी एक अतिशय गूढ कथा आहे. असे म्हणतात की, राजा राजसेनकडे ‘परस’ (परीस) नावाचा दगड होता. त्या दगडाने लोखंडी वस्तूला स्पर्श केल्यास ती सोन्यात बदलू शकत असे. या रहस्यमय दगडासाठी इतिहासात त्याकाळी बरीच युद्धेही लढली गेली, पण राजा राजसेनचा पराभव झाल्यावर त्याने किल्ल्यातच असलेल्या भुयारात हा परस दगड फेकला. त्यानंतरच्या काळात अनेक राजांनी हा किल्ला खोदून परस दगड शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळालेले नाही.
दरम्यान, आजही अनेक लोक रात्री येथे परस दगडाच्या शोधात तांत्रिकांना सोबत घेऊन जातात, पण त्यांना यश येत नाही. हा दगड शोधण्यासाठी येथे आलेल्या बर्याच लोकांचे मानसिक संतुलन देखील गमावले आहे, कारण परस दगडाचे कुणीतरी अदृश्यरित्या रक्षण करते असे म्हणतात. परंतु पुरातत्व विभागाला अद्याप असे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे किल्ल्यामध्ये परस दगड अस्तित्त्वात असल्याचे दिसून आलेले नाही. परंतु केवळ ऐकलेल्या दंत कथांवरून अनेक लोक परस दगडाच्या शोधात या किल्ल्यावर छुप्या मार्गान पोहचतात.