इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अमेरिकेतील डॉक्टरांच्या पथकाने गर्भातच बाळावर मेंदूची शस्त्रक्रिया केली. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, जिथे बाळाच्या मेंदूची शस्त्रक्रिया गर्भातच करण्यात आली. वास्तविक मुलाला ‘Venus of Galen mallformation (VOGM)’ नावाचा आजार होता, ज्यामध्ये त्याच्या मेंदूपासून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या नसांमध्ये समस्या होती. परिस्थिती अशी होती की, जर शस्त्रक्रिया झाली नसती, तर जन्मानंतर लगेचच बाळाचा मृत्यू झाला असता. मात्र, आता या शस्त्रक्रीयेमुळे बाळ सुखरुप आहे.
डॉक्टर म्हणाले
अमेरिकेतील बोस्टन येथील ब्रिघम आणि महिला रुग्णालय आणि बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये ही अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करणारे डॉ. डॅरेन ऑरबाच म्हणाले की, ‘मुलाच्या जन्मानंतर लगेचच त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असती किंवा त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळेच गर्भातच बाळाची मेंदूची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
VOGM म्हणजे काय?
डॉक्टरांनी सांगितले की ‘व्हीनस ऑफ गॅलेन मॅलफॉर्मेशन’ नावाचा आजार हा मेंदूच्या नसांचा दुर्मिळ आजार आहे. सामान्यत: मेंदूमधून रक्त पेशींमधून शिरांमध्ये जाते. पेशी पातळ असतात आणि ते रक्तप्रवाह मंदावतात, ज्यामुळे रक्त शिरापर्यंत पोहोचणे सोपे होते. गर्भाशयात शस्त्रक्रिया केलेल्या बाळाला व्होगम आजार होता, ज्यामध्ये पेशींचा विकास योग्य प्रकारे होत नव्हता, ज्यामुळे रक्त त्याच्या मेंदूमधून थेट रक्तवाहिनीत जाते. त्यामुळे मेंदूला इजा, मज्जातंतूंमध्ये गडबड किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका होता.
जगातील पहिली शस्त्रक्रिया
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बाळाची जगण्याची केवळ ४० टक्के शक्यता आहे. आता डॉक्टरांनी गर्भातील मुलाच्या मेंदूची शस्त्रक्रिया करून त्याच्या मेंदूमध्ये कृत्रिम पेशी प्रत्यारोपित केल्या आहेत, ज्या त्याच्या मेंदूतील पेशी म्हणून काम करतील. गर्भधारणेच्या ३४ व्या आठवड्यात डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली, जी जगातील अशा प्रकारची पहिली शस्त्रक्रिया आहे.
Historic Infant Baby Brain Surgery in Womb USA