नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपुर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले *”शिवपुत्र संभाजी”* ह्या महानाट्याचे आयोजन नाशिक शहरात करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांची प्रमूख भूमिका असलेले हे महानाट्य आहे. १८ एकर परिसरात, तीन मजली सेट, घोडे – तोफा आणि जवळ जवळ २०० कलाकारांच्या संचासह हे महानाट्य सादर होणार आहे. यासंदर्भात आज डॉ. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
जगदंब क्रिएशनच्यावतीने हे महानाट्य २१ ते २६ जानेवारी या दरम्यान नाशकात होणार आहे. स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास या महानाट्याद्वारे सादर केला जाणार आहे. नाशिकातील तपोवनात असलेल्या मोदी मैदानात सायंकाळी ६ वाजता हे महानाट्य सादर केले जाणार आहे.
https://twitter.com/JagdambCreation/status/1608517269117874176?s=20&t=49fDg-JKaCzXTZplNTkrdg
या महानाट्यासाठी १० हजार प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच, या महानाट्य परिसरात विविध प्रकारचे स्टॉल्सही लागणार आहेत. त्यामुळे नाशिककर संपूर्ण दिवस या परिसरात घालू शकणार आहेत. या महानाट्यासाठीचे बुकींग बुक माय शोवर उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर या महानाट्याची तिकीटे कालिदास कलामंदिरासह शरणपूररोड आणि बिटको चौक येथील रेमंड शॉपमध्ये उपलब्ध आहेत.
https://twitter.com/JagdambCreation/status/1608520382235168774?s=20&t=49fDg-JKaCzXTZplNTkrdg
स्थानिक कलाकारांना संधी
महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन, पुणे निर्मित, जगदंब क्रिएशन मुंबई प्रस्तुत आणि श्री. महेंद्र महाडिक लिखित, दिग्दर्शित “शिवपुत्र संभाजी” ह्या महानाट्याचे प्रयोग “नाशिक” शहरामध्ये दि.21 जानेवारी ते 26 जानेवारी 2023 दरम्यान तपोवन मोदी मैदान येथे आयोजित करण्यात आले आहेत. सदर महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका “सुप्रसिद्ध अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे” साकारत आहेत. तर डॉ गिरीश ओक औरंगझेब, महाराणी येसूबाई प्राजक्ता गायकवाड, अनाजी दत्तो महेश कोकाटे व इतर टीव्ही सिरीयल कलाकार महत्वाच्या भूमिका साकारत आहेत. सदर महानाट्यात “स्थानिक कलाकारांना” सुद्धा रंगमंचावर काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. नाशिक आणि परिसरातील जास्तीत जास्त कलाकारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहान आयोजकांनी केले आहे. सहभागासाठी संपर्क क्रमांक असे
सौरभ – 9673722844
महेश – 9604733376
राजेंद्र मैंद – 96379 46259
Historic Drama Sambhaji Mahanatya in Nashik