नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये स्थानिक तरुणांच्या सहभागाला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोंकणी भाषेत तयार केली जाईल. या निर्णयामुळे लाखो इच्छूक उमेदवार त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेत परीक्षा देऊ शकतील आणि त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल.
कॉन्स्टेबल जीडी ही कर्मचारी निवड आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक असून देशभरातून लाखो उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी उत्सुक असतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये 1 जानेवारी 2024 पासून परीक्षा घेतली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृह मंत्रालय प्रादेशिक भाषांच्या वापराला आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये स्थानिक तरुणांच्या सहभागाला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, प्रश्नपत्रिका खालील 13 प्रादेशिक भाषांमध्ये तयार केली जाईल:
आसामी
बंगाली
गुजराती
मराठी
मल्याळम,
कन्नड
तमिळ
तेलुगू
ओडिया
उर्दू
पंजाबी
मणिपुरी
कोंकणी
या निर्णयामुळे लाखो इच्छूक उमेदवार त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेत परीक्षा देऊ शकतील आणि त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल. विविध भारतीय भाषांमध्ये परीक्षा आयोजित करणे सुलभ करण्यासाठी गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोग विद्यमान सामंजस्य कराराच्या परिशिष्टवर स्वाक्षरी करेल. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ही कर्मचारी निवड आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक असून देशभरातून लाखो उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक असतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये 1 जानेवारी 2024 पासून परीक्षा घेतली जाईल.
स्थानिक तरुणांना त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी यानिमित्ताने मिळत असून तिचा उपयोग करण्यासाठी आणि मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशाची सेवा करण्यात करिअर करण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांनी व्यापक मोहीम सुरू करणे अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय प्रादेशिक भाषांच्या वापराला आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.
In a historic decision, MHA decides to conduct the Constable (GD) CAPF exams in 13 regional languages also. It will give an impetus to participation of local youth in CAPFs.
The decision reflects PM @narendramodi Ji's commitment to developing and encouraging regional languages. pic.twitter.com/Dd1iNWzyL5
— गृहमंत्री कार्यालय, HMO India (@HMOIndia) April 15, 2023
Historic Decision Constable Post Recruitment HMA Order Language