नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर येथील औद्योगिक वसाहती टायर उत्पादक करणारे सीएटी या कंपनी कामगारांच्या पगारवाढीचा करार नुकताच पार पडला. औद्योगिक वसाहतीत हा करार ऐतिहासिक करार म्हणून चर्चिला जात आहे. सदर कराची वैशिष्ट्य म्हणजे या करारात कंपनीला कोणतीही उत्पादन वाढ न देता हा करार करण्यात आला आहे. सदर करार ४२ महिन्यांसाठी असून दोन टप्प्यांमध्ये करण्यात आला आहे.
पहिला टप्पा २८ महिन्यांकरता असून त्या महिन्यांसाठी पगार १० हजार ३०० वाढ होणार असून पुढील १४ महिन्यांकरता १५ हजार १०० रुपये पगारवाढ असणार आहे. या कराराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे करारासाठी वीस लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स करण्यात येणार आहे. कोणत्याही कारणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना वीस लाखाची नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे. ६० कामगारांच्या आऊट सोर्सेसच्या जॉबवर या कराराची बोलणी तसेच काही प्रमाणातील ऑटोमेशनचा या करारात समावेश करण्यात आला आहे. सदर करार नऊ महिन्यात बारा मीटिंग घेऊन यशस्वी करण्यात आला. हा करार १ नोव्हेंबर २०२२ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेल्या मल्टी स्किल पूल मधील तेरा कामगारांना या करार अंतर्गत कायम करण्यात येणार आहे. पगारी रजा मिळण्याच्या दिवसांमध्ये कपात करण्यात आली असून २४० दिवसांनी २१० दिवसांची पगारी रजा मिळणार आहेत. मागील सर्व सवलती या यापुढे चालू राहणार असून हा करार यशस्वी करण्यासाठी मुंबई श्रमिक संघ या संघटनेच्या वतीने डॅा. विवेक मोंटेरो, सरचिटणीस हेमकांत सामंत तसेच स्थानिक कमिटी अध्यक्ष भिवाजी भावले, सरचिटणीस कैलास धात्रक उपाध्यक्ष विजय यादव, पोपट सावंत, खजिनदार वाल्मीक भडांगे, सदस्य आधा शंकर यादव, प्रमोद बेले, पृथ्वीराज देशमुख यांनी सहभाग घेतला तर व्यवस्थापनाच्या वतीने मिलिंद आपटे सिएटच्या एचआरओ जय शंकर, सीनियर व्हीपी विकास शिर्के, सिएट ग्रुप एचआर हेड श्रीनिवास पत्की, प्लॅंट हेड श्री कंसारा, फायनान्स हेड रोहित साठे, एचआर हेड नाशिक प्लॅंट विजय जोशी प्राडक्शन हेड नोबि डिसिल्वा, इंजीनियरिंग हेड यांनी चर्चेत सहभाग घेतला.
Nashik CEAT Company Increment Workers Contract Salary
Industry