इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारताची बॅडमिंटन स्टार पुसारला वेंकट सिंधू आणि युवा खेळाडू लक्ष्य सेन यांनी सोमवारी आपापल्या अंतिम लढती जिंकून राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकले. सिंधूने कॅनडाच्या मिशेल लीचा 2-0 असा पराभव करत महिला एकेरीत आपले पहिले राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकले. भारतीय बॅडमिंटनपटूने ग्लासगो 2014 मधील सुवर्णपदक विजेत्या मिशेलचा 21-15, 21-13 असा पराभव केला. लक्ष्यने पुरुष एकेरीच्या लढतीत मलेशियाच्या एनजी योंगचा 2-1 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत असलेल्या 20 वर्षीय लक्ष्यने योंगचा 19-21, 21-9, 21-16 असा पराभव करत पहिला गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले.
पहिला गेम गमावल्यानंतरही लक्ष्य दडपणाखाली आला नाही आणि त्याने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत पहिले राष्ट्रकुल सुवर्ण जिंकले. यापूर्वी लक्ष्यने आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, तो थॉमस कप 2022 जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. प्रकाश पदुकोण, सय्यद मोदी आणि पारुपल्ली कश्यप यांच्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकणारा लक्ष्य सेन हा चौथा भारतीय आहे. भारताने प्रथमच कॉमनवेल्थ गेम्सच्या एकाच आवृत्तीत पुरुष आणि महिला बॅडमिंटन एकेरीत सुवर्णपदक जिंकले आहे.
https://twitter.com/MoCA_GoI/status/1556621735713128448?s=20&t=O8oUIPRq-nfNtjSJ35ypeQ
भारताची बॅडमिंटन स्टार पुसारला वेंकट सिंधू हिने सोमवारी कॅनडाच्या मिशेल ली हिचा 2-0 असा पराभव करून राष्ट्रकुल 2022 मधील महिला एकेरीचे पहिले सुवर्णपदक जिंकले. सिंधूने ग्लासगो 2014 मधील सुवर्णपदक विजेत्या मिशेलचा 21-15, 21-13 असा पराभव केला. रिओ 2016 ची सलवीर पदक विजेती सिंधू कोर्टवर आली तेव्हा तिचा पाय पट्टीने बांधला होता, पण त्याचा तिच्या खेळावर कोणताही परिणाम झाला नाही.
पहिल्या गेममध्ये तिला मिशेलकडून आव्हान मिळाले होते, मात्र दुसऱ्या गेममध्ये कॅनडाच्या खेळाडूच्या नकळत झालेल्या चुकांमुळे सिंधूचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. यापूर्वी सिंधूने ग्लासगो 2014 गेम्समध्ये कांस्य आणि गोल्डकोस्ट 2018 गेम्समध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि या विजयासह सिंधूने राष्ट्रकुल पदकांचा सेट पूर्ण केला. गोल्डकोस्ट 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही ती एक भाग होती, परंतु महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1556609045741584384?s=20&t=O8oUIPRq-nfNtjSJ35ypeQ
Historic 20 year old Lakshya Sen Win Gold Medal CWG22
Commonwealth Games Gold Medal Badminton