हिंगोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ५ सप्टेंबर शिक्षण दिनाला अवघे दोन दिवस बाकी असतांना दुर्दैवी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील शिवनी फाट्याजवळ कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात शिक्षक पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कार चालवत असलेल्या या दाम्पत्याचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जयप्रकाश कावरखे आणि मंजुषा कावरखे असे मृत शिक्षक पती पत्नीचे नाव आहे. तर पराग कावरखे असे जखमी मुलाचे नाव आहे. रविवारी सकाळच्या वेळी या कारचा अपघात झाला. डिव्हायडरला जाऊन धडकलेल्या कारने तीन-चार पलटी घेतली. त्यानंतर ही कार रस्त्याच्या एका बाजूला पडली. शिवनी फाट्याजवळ हा अपघात मोठा आवाज आला. त्यामुळे परिसरात असलेल्या नागरिकांनी आणि इतर वाहनधारकांनी तात्काळ धाव घेत अपघातग्रस्त यांना मदत केली. तसेच, जखमी तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्थानिकांनीच पोलिसाना या अपघाताची माहिती दिली.
Fatal car accident after hitting a divider; Teacher husband and wife died on the spot
Hingoli Car Road Accident Husband wife death son injured