नाशिक – हिंदुस्तान स्काऊट गाईडच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले त्यानंतर मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. महाराष्ट्र स्काऊट गाईडचे राज्य अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर शालिनीताई बोरसे विद्यालयात सर्व कोरोना नियमांचे पालन करीत संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मंचावर हिंदुस्तान स्काऊट गाईडचे राज्य कार्यकारिणी सचिव गोपाळ डोंगरे, महाराष्ट्राचे प्रशिक्षण आयुक्त डॉ. प्रविण चित्ते, प्राचार्य कुणाल कातकडे, भीमराव गरड, राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. प्रविण चित्ते यांनी हिंदुस्तान स्काऊट गाईड संस्थेचे उद्दिष्ट कार्यप्रणाली त्याचप्रमाणे विविध शाळांमध्ये राबवण्याची शिबिरे व उपक्रम सविस्तरपणे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी हिंदुस्तान स्काऊट गाईडच्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा होणारा सर्वांगीण विकास व प्रगती विषद करून सांगितली. राज्य कार्यकारणी सचिव गोपाळ डोंगरे यांनी अधिकाअधिक शाळा, शिक्षक, व विद्यार्थी यांची हिंदुस्तान स्काऊट गाईड उपक्रमात नोंदणी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी पुढील प्रमाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष अस्मिता पटेल, श्रीमती मल्लीकर, विनोद देशपांडे, कमिशनर स्काऊट बी. डी. कदम, कमिशनर गाईड साबिया सय्यद, सचिव अरुण नवले, सहाय्यक सचिव विद्या पाटील, सहसचिव सुधीर पाटील, कोषाध्यक्ष नितीन जोशी, प्रशिक्षण प्रमुख व्हिनस वाणी, स्काऊट मास्टर स्मिता मुजुमदार, गाईड मास्टर श्रीमती व्ही. डी. देवरे, रेंजर लीडर अंजली खांडेकर, ऑर्गनायझर भीमराव गरड, प्रशिक्षण समन्वयक शितल बागुल, राजेंद्र जोशी, कायदेशीर सल्लागार ॲड. राज ठाकरे, प्रसिद्धीप्रमुख दिनेश ठोंबरे, योगेश पवार या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. उपस्थितांनी उपक्रम यशस्वीतेसाठी स्काऊट प्रतिज्ञा म्हटली स्काऊट गाईड गीत तसेच वंदे मातरम नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पाटील यांनी केले, आभार भारती काळे यांनी मानले.