शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

हिंदू महिलेचा ख्रिश्चन धर्मांतराचा धक्कादायक प्रकार; भारतीय मानवाधिकार परिषदेने केले उघड

ऑगस्ट 8, 2022 | 12:13 pm
in राज्य
0
IMG 20220808 WA0019

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्ह्यात एका हिंदु महिलेचे जबरदस्तीने बेकायदेशीर धर्म परिवर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या भारतीय मानवधिकार परिषेदेने उघडकीस आणाला आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी आणि पीडितेला न्याय देण्यासाठी लढा उभारण्याचे परिषदेने जाहीर केले आहे.

भारतीय मानवाधिकार परिषदेने पत्रकार परिषदेत सांगितले की, ख्रिश्चन धर्मात जबरदस्तीने बेकायदेशीर धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार अहमदनगर जिल्ह्यातील एका पिडीत महिलेने आमच्याकडे केली. त्यानंतर त्याची दखल घेत आम्ही सखोल चौकशी करून या पिडीतेला न्याय देण्याची आणि या प्रकरणाचा पुर्नतपास करण्याची मागणी केली आहे. यासाठी कर्नाटक, उत्तर प्रदेश राज्यात जसा कठोर कायदा करण्यात आला तसा महाराष्ट्रात तातडीने करण्यात यावा अशीही मागणी परिषदेने केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ब्राम्हणी (ता. राहुरी) येथील ही पीडित महिला आहे. परिषदेने यासाठी सत्याशोधन समिती गठित करून या तक्रारीतील तथ्य जाणून घेतले . तेथील पोलिसांनी व त्या महिलेवर अत्याचार करणाऱ्यांनी बेकायदेशीर कामे केल्याचा आणि मानवी अधिकारांचे घोर उल्लंघन झाल्याचा आरोप परिषदेने केला आहे. तशी माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत या परिषदेचे संचालक अविनाश मोकाशी यांनी दिली. यावेळी चिंतन मोकाशी, विधी सल्लागार अॅड. अमित सोनवणे, सत्यशोधक समितीचे सदस्य अॅड. अरुण बनकर, प्रिती मोकाशी उपस्थित होते.

मानवाधिकारांवर धर्मांतराच्या गुन्हेगारीकरणामुळे गदा येत असून, राहुरीतील प्रकरण हे हिमनगाचे टोक आहे, असे मत अविनाश मोकाशी यांनी व्यक्त केले. राज्य सरकारनेही बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणावा, अशी मागणी ॲड सोनवणे यांनी केली.

याबाबत सविस्तर माहिती देतांना त्यांनी सांगितले की, कायद्याच्या योग्य प्रक्रियेनुसार निराकरण करुन न्याय देण्याची मागणी त्या महिलेकडून करण्यात आली होती. त्या आधारावर भारतीय मानवाधिकार परिषदेने मानवी हक्कांचे उघड उल्लंघन केल्याबद्दल हस्तक्षेप करण्याचा आणि कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला. समितीने विविध कलमांतर्गत गुन्ह्यांसह मानवी हक्कांचे घोर उल्लंघन झाले आहे, असा निष्कर्ष काढला आहे. असेही अविनाश मोकाशी यांनी सांगितले.

सर्व संशयित आरोपी व्यक्ती, संस्था यांची ओळख पटवून त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, बेकायदेशीर रूपांतरणासाठी व्यक्तींचा आणि संस्थांचा गैरवापर केला जात असून, विदेशी निधीबाबत आर्थिक स्त्रोतचा शोध घ्यावा, पीडित महिलेस आर्थिक नुकसान भरपाई देण्यात द्यावी. राज्य सरकारनेही बेकायदेशीर धर्मांतरणावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच यासाठी उत्तर प्रदेश आणि कर्नाटक सरकारप्रमाणे कायदा लागू करावा अशीही मागणी करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करण्याया तपास अधिकाऱ्यांवर आणि तेथील हे प्रकरण गांभीर्याने न घेण्याऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी अविनाश मोकाशी यांनी केली. कोऱ्या कागदावर या महिलेची स्वाक्षरी घेतली असल्याने ही बाब गंभीर असल्याचे देखील मोकाशी यांनी नमूद केले. परिषदेच्या समितीने हा अहवाल राष्ट्रपती राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग यासह विविध प्राधिकरणांना सादर केला आहे.

परिषदेच्या सत्यशोधन समितीने काढलेले निष्कर्ष असे
धर्मांतराच्या विरोधात कोणतीही कायदेशीर तरतुदी नसली तरी, गुन्ह्यातील मजकुरावर विश्वास न ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. म्हणून एका हिंदू महिलेचे बेकायदेशीरपणे ख्रिश्चन धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे सष्ट होते. एका व्यक्तीने दाखल केली असली तरी चर्चचे अनेक कार्यकर्ते एका गटात आले होते आणि त्यांनी त्याच पद्धतीने अनेक स्थानिक ग्रामस्थांना त्यांचा धर्म बदलण्यासाठी बेकायदेशीरपणे प्रवृत्त केले.

परिषदेच्यावतीने पडताळणी दरम्यान कमल सिंग विरुद्ध याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा गुन्हेगारी कटात आणि बाप्तिस्मा प्रक्रियेत सहभागी असलेल्या आणि सक्रियपणे उपस्थित असलेल्या सहयोगींची नावे निष्पन्न झाली. मात्र, त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई सुरू केलेली नाही. धर्म परिवर्तन करणाऱ्यांची टीम दोन वाहनांतून या गावात आले होते. दखलपात्र गन्ह्याची नोंद करण्यात आली असूनही त्याचा तपास करण्यास संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे अपयश दिसून येते. सर्व संशयितांना कायदेशीर कारवाई न करता मुक्तता करण्यात आली.

तक्रारदाराला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी आर्थिक प्रलोभन दाखवून तिचा विनयभंग केला. तिच्या इच्छेविरुद्ध ‘बाप्तिस्मा’ करण्याची प्रक्रिया करण्यास भाग पाडण्यात आले, ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी तिच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दुर्बलतेचा गैरफायदा घेतल्याचे या वेळी सांगितले. अनेक व्यक्तींचा या प्रकरणात सहभाग असूनही एकाच व्यक्ति विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तक्रार घेताना वाहुनांचा वापर करण्याच्या कटाचा तपशील आणूनबुजून वगळला असल्याने संशय बळावला आहे.

Hindu Women Christian Religious Transformation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निसर्ग सौंदर्यने खुललेला साल्हेर किल्ला परिसर ( बघा व्हिडीओ )

Next Post

गृहमंत्रीपदाचा तिढा सुटला? याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
CM DCM Shinde Fadanvis press e1657865706678

गृहमंत्रीपदाचा तिढा सुटला? याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011