इंडिया दर्पण विशेष लेखमाला
बुलेटवरील भारत भ्रमंतीचा थरार
हिमालयातील सर्वात खडतर प्रवास…
हुंदरहून दुपारी लेह मध्ये रिटर्न येत असताना नॉर्थ पुल्लू मध्ये आर्मी जवानांसोबत लंच अरेंज करण्यात आला होता. तिथे लंच केला.
संध्याकाळी लेह मध्ये गव्हर्मेंट ऑथॉरिटी कडून एन डी एस मेमोरियल स्पोर्ट्स ग्राउंड येथे आमच्यासाठी लेहवासीयां तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तेथील नव्यानेच स्थापन झालेला स्वतंत्र लेह, लडाख केंद्रशासित प्रदेश याचे गव्हर्नर यांच्या हस्ते आमच्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सर्व रायडर्स आणि ऑर्गनायझर्स यांच्या दरम्यान एक मीटिंग आयोजित करण्यात आली. रात्री पुन्हा लेहच्या टीसी २५७ मध्ये नाईट स्टे करून दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात अवघड प्रवासाची सुरुवात करायची होती.

इंदिरानगर, नाशिक
इ मेल – [email protected]
लेह ते जिस्पा हिमाचल मिटिंगचे महत्व येथे नोंदवण्यास कारण की, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला लेहपासून जिस्पा हिमाचल प्रदेश हा चारशे किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण करायचा होता. तो पूर्ण करण्यासाठी कुठल्या योजना अमलात आणायच्या यासाठी ती मीटिंग भरवली गेली होती. त्या मीटिंगमध्ये असे ठरले की सर्व ७४ रायडर्सने एकत्र प्रवास न करता १५-१५ च्या पाच टीम करायच्या. त्या टीम मध्ये महिलांची टीम विभाजित करण्यात यावी, असे ठरले. कारण पुढे रस्ता खडतर असल्यामुळे पुरुष सभासदांकडून महिला सभासदांना रस्त्यात काही अडचणी आल्यास मार्ग मोकळा करून देता येईल. तो दिवस आजही माझ्या अंगावर शहारे आणतो.
पहाटे चारला उठून पाच वाजता सुरू केलेला तो प्रवास. उणे दोन टेंपरेचर मध्ये सकाळी लेह पासून प्रवास सुरू झाला. अंगावर काटा येत होता. गरम कपडे आणि रायडींग गियर्स घालून सुद्धा मला प्रचंड थंडी वाजत होती. लेहपासून पहिला ब्रेक 100 किलोमीटर झाल्यानंतर आम्ही चहापाणी घ्यायला सकाळी सात वाजता एका घराजवळ थांबलो. ते घर वजा हॉटेल होते. तिथे चहा आणि मॅगी बनवून देत होते. पण तिथे राहणाऱ्या आण्टींना आम्ही रिक्वेस्ट केली. प्रचंड भूक लागली होती म्हणून त्यांनी आम्हाला गरमागरम भजी तळून दिली. चहा, मॅगी आणि भजी पोटभर हादडल्यानंतर पुन्हा मायनस चार वातावरण आणि बर्फ वृष्टी मध्ये पुढचा प्रवास सुरू केला.
आता माझा हात मला साथ देत नव्हता. गाडीचा थ्रोटल एक्सलरेट करताना माझ्या हाताच्या नसा प्रचंड आकसत होत्या. रस्ता खराब होतात. आणि वेळोवेळी जागोजागी माझी गाडी आणि माझ्यासोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांची गाडी स्लीप होत होती. रात्री पाऊस झाल्यामुळे सबंध रस्ता हा चिखलाचा झाला होता. सहा फुटाचा छोटासा रस्ता त्यात घाटाचा. पलीकडे ८-१० हजार फुट खोल दरी. वेळोवेळी त्या रस्त्यात शेजारून जाणाऱ्या आर्मीच्या ट्रक. प्रचंड थ्रीलींग होत ते. मला तर सारखी घरची आठवण येऊ लागली. दरीला कडा नसल्याने तोल गेला तर मुलांच कसं होणार? आपण सुखरूप घरी पोहचू ना? वगैरे वगैरे… विचार मनात काहूर माजवत होते. आणि त्यात दोन-तीन वेळा रिव्हर क्रॉसिंग लागली. रिवर क्रॉसिंग पण इतकी भयानक होती की जाड्या मोठ्या दगडांमध्ये गाडी काढताना मी सोबत असलेल्या सहकाऱ्यांना मदत मागितली. कधी धक्का मारून तर कधी मलाच गाडीवरून उतरवून पुढे चालत येण्यास सांगून कसेबसे ते रिव्हर क्रॉस केली. अखेर आम्ही रोहतंक पास अटल टनल पर्यंत पोहोचलो.
(पुढच्या भागात अटल टनेलचा अनुभव…)
सौ दिपिका दुसाने
इंदिरानगर, नाशिक
इ मेल – [email protected]
Himalayan Region Bike Ride Thrilling Experience by Deepika Dusane