इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने इंग्लंड दौऱ्यात धमाकेदार द्विशतक करत विराट कोहली याचा महारेकॉर्ड ब्रेक केला. अगोदर शुबमनने लीड्समध्ये कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक केले नंतर दुसऱ्या सामन्यात धमाकेदार द्विशतक ठोकलं. शुबमनला त्रिशतक करण्याची संधी होती. मात्र शुबमन त्रिशतक करण्यात अपयशी ठरला. शुबमनने एकूण २६९ धावांची खेळी केली. शुबमनने यासह भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा महारेकॉर्ड ब्रेक केला. विराटने २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुण्यात ३३६ बॉलमध्ये नॉट आऊट २५४ रन्स केल्या होत्या.
शुबमन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा पहिला कर्णधार ठरला. त्याने ३८७ बॉलमध्ये ६९.५१ च्या स्ट्राईक रेटने ३० फोर आणि ३ सिक्सच्या मदतीने २६९ रन्स केल्या. शुबमनने भारताकडून इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला कर्णधार होण्याचा बहुमान मिळवला. शुबमनआधी एकाही भारतीय कर्णधाराला अशी कामगिरी करता आली नव्हती. तसेच भारतासाठी कर्णधार म्हणून कसोटीत ६ वर्षांनंतर हे पहिलं द्विशतक ठरलं.
दरम्यान शुबमनने केलेल्या या २६९ धावांच्या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात ५८० पार धडक देता आली. टीम इंडियाकडून शुबमन व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र दोघांचीही शतकाची संधी हुकली. यशस्वीने १८७ रन्स केल्या. तर ऑलराउंडर जडेजाने ८९ धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर यानेही संयमी पण तडाखेदार खेळी केली. वॉशिंग्टनने ४२ धावांची खेळी केली.