इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नवी दिल्लीतील एरोसिटी परिसरातल्या हॉटेलमध्ये चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस स्टेशनने मुलीसह तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक टोळीचा म्होरक्या आहे. त्यांच्या ताब्यातून ३० हजार रुपये, तीन मोबाईल फोन आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.
पोलिस उपायुक्त संजय त्यागी यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, अटक करण्यात आलेले आरोपी हा उत्तर प्रदेशातील असून रियास सिद्दीकी आणि बिहारमधील बेगुसराय अशी त्यांची नावं आहे. एरोसिटी परिसरातील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती आयजीआय विमानतळ पोलिस स्टेशनला मिळाली. या माहितीवरून उपनिरीक्षक रमेश चंद यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. माहितीची पुष्टी करण्यासाठी, पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून ओळखल्या जाणार्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. करार निश्चित झाल्यानंतर हॉटेल हॉलिडे इनमध्ये एक खोली बुक करण्यात आली. काही वेळाने नवीन तरुणीसोबत हॉटेलमध्ये पोहोचला आणि बनावट ग्राहक बनलेल्या पोलिसाकडून पैसे घेतले.
बनावट ग्राहकाने इशारा केल्यावर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आणि दोघांनाही अटक केली. नवीनच्या चौकशीत या टोळीचा म्होरक्या रियास सिद्दीकी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी रियासला गुरुग्राम येथून अटक केली. आरोपी गुरुग्राममधील सेक्टर ४५ मध्ये हॉटेल भाडेतत्त्वावर घेऊन हा गुन्हा करत असल्याचे तपासात समोर आले आहे. तो आपल्या तीन साथीदारांसह दिल्ली आणि एनसीआरमध्ये हे रॅकेट चालवत होता.
ग्राहक ओळखीच्यांमार्फत दलालांकडे जात असत. दलाल त्यांना व्हॉट्सअॅपवर मुलींचे फोटो पाठवत असत. सौदा ठरल्यानंतर ग्राहकांकडून ऑनलाइन काही पैसे घेतल्यानंतर दलाल मुलींना त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी नेऊन त्यांच्याकडून सर्व पैसे उकळायचे. या टोळीत सहभागी असलेल्या इतर लोकांची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.