रविवार, सप्टेंबर 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिल्लीत केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक…शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नांवर झाली चर्चा

by Gautam Sancheti
ऑगस्ट 10, 2025 | 7:22 am
in संमिश्र वार्ता
0
Rawal 1 1 1024x768 1 e1754790679186


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली.

तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि कृषी कार्यक्षमता वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवत मंत्री श्री. रावल यांनी केंद्रीय योजना तयार करण्याची विनंतीही केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या शुक्रवारी झालेल्या दिल्ली येथील भेटीदरम्यान केली.

मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी नमूद केले की, महाराष्ट्रासह देशभरात कांदा, डाळी, संत्री, डाळिंब, केळी आणि फुले यांसारख्या शेती उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, अपुऱ्या बाजार यंत्रणा आणि वैज्ञानिक साठवणूक सुविधांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. शेतमाल काढणी पश्चात अपुऱ्या साधनांमुळे काही प्रमाणात नुकसान होते. याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि देशाच्या कृषी कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

श्री. रावल यांनी शेतमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी विशेष समर्थन योजना, विकेंद्रित वैज्ञानिक साठवणूक सुविधा, कोल्ड चैन, डिजिटल सूची व्यवस्थापन आणि कार्यक्षम रसद प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. बाजार माहिती प्रणालीच्या एकत्रीकरणाद्वारे उत्पादन आणि किंमतीच्या ट्रेंडचा अचूक अंदाज घेऊन शेतकऱ्यांना वेळेवर माहिती पुरवण्यावरही त्यांनी भर दिला. यामुळे धोरणकर्त्यांना माहितीवर आधारित निर्णय घेता येतील.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधुनिकीकरणासाठी मंत्री श्री. रावल यांनी केंद्रीय योजना तयार करण्याची मागणी केली, ज्यामध्ये झाकलेली लिलाव व्यासपीठे, ग्रेडिंग-तोलन व्यवस्था, थंड साठवण, कोरडे कोठार, पॅकेजिंग केंद्रे आणि कचरा व्यवस्थापन सुविधांचा समावेश आहे. एपीएमसी परिसरातील न वापरलेल्या जागेत लहान अ‍ॅग्रो-प्रोसेसिंग युनिट्स, शेतकरी-केंद्रित सुविधा उभारण्यासाठी प्रोत्साहन आणि तांत्रिक सहाय्य देण्याची विनंतीही त्यांनी केली. तसेच, ई-नाम सारख्या डिजिटल व्यासपीठांशी एपीएमसीला जोडण्यासाठी अनुदान आणि क्षमता बांधणीवर भर देण्यात यावा असे सांगितले.

या बैठकीतून ठोस रोडमॅप तयार करून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाऊ शकते, असे श्री. रावल यांनी सांगितले. अशा उपायांमुळे शेती व्यवसाय टिकाऊ होईल आणि भारताची आंतरराष्ट्रीय शेती बाजारातील नेतृत्व भूमिका अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था…महसूलमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पहिल्या मालगाडीचे आगमन….पंतप्रधानांनी केले कौतुक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

DEVENDRA
संमिश्र वार्ता

राज्यात अतिवृष्टी….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सकाळी आढावा

सप्टेंबर 28, 2025
Screenshot 20250928 104220 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, जिल्ह्यातही पावसाचा जोर…धरणांतून विसर्ग वाढवला

सप्टेंबर 28, 2025
GwyqMwabYAA1fOl e1757399728553
महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप स्पर्धेत आज भारत – पाकिस्तानमध्ये अंतिम सामना…

सप्टेंबर 28, 2025
15 1024x683 1
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना हा जनसेवा पुरस्कार प्रदान

सप्टेंबर 28, 2025
Untitled 44
संमिश्र वार्ता

नवरात्र विशेष… माता वैष्णोदेवी… कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान… अशी आहे या स्थानाची महती…

सप्टेंबर 28, 2025
Screenshot 20250928 074822 Collage Maker GridArt
मुख्य बातमी

तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी ३९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

सप्टेंबर 28, 2025
Untitled 43
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक-वाढवण एक्स्प्रेस वे आणि फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पास शासनाची तत्त्वतः मान्यता

सप्टेंबर 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक खर्चावर लगाम घालावा, जाणून घ्या, रविवार, २८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 27, 2025
Next Post
Untitled 11

जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पहिल्या मालगाडीचे आगमन….पंतप्रधानांनी केले कौतुक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011