इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पती-पत्नीच्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला आहे. पती असो किंवा पत्नी, कोणाच्याही संमतीशिवाय कॉल डिटेल्स घेणे घटनाबाह्य ठरवले आहे. हे त्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. एका व्यक्तीच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
पत्नीचे अवैध संबंध असल्याचा आरोप या प्रकरणातील पतीने केला होता. यासंबंधी त्याने न्यायालयातदेखील धाव घेतली. तिच्या संबंधांविषयी खात्री करण्यासाठी पतीने थेट कोर्टात धाव घेत पत्नीच्या प्रियकराच्या फोनचे तपशील मागितले होते. या तपशीलांतून त्याचे लोकेशन ट्रेस होईल आणि तो त्याच्या अनुपस्थितीत तिच्या घरी जायचा हे सिद्ध होईल, असे तो म्हणाला. त्यानंतर कोर्टाने फोनचे डिटेल्स मागविले होते. त्यानुसार, कौटुंबिक न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या कॉल डिटेल्सचा अहवाल काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महिलेने कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, तिच्यावर अवैध संबंध असल्याच्या आरोपाखाली फसवले जात आहे. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी या प्रकरणात महिलेच्या प्रियकराचे मोबाइल डिटेल्स घेता येणार नाहीत, असे म्हटले आहे. हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे, असे या प्रकरणात सुनावले.
पतीची विनंती अमान्य
पत्नीच्या विवाहबाह्य संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पतीने हा खटाटोप केला होता. मात्र उच्च न्यायालयाने गोपनीय माहिती काढण्याचे अमान्य केले. दरम्यान, या प्रकरणाची मोठी चर्चा सध्या रंगली आहे.
High Court Order on Husband Wife Call details
Legal Bengaluru