इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत गुजरात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पहिल्या लग्नातून जन्मलेल्या विधवेच्या मुलांना दुसऱ्या पित्याच्या संपत्तीवर हक्क आहे. निरुबेन चिमणभाई पटेल यांच्या खटल्यात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. जेव्हा एखादी विधवा इच्छापत्राशिवाय मरण पावते, तेव्हा तिच्या वारसांना हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम १५ अंतर्गत मालमत्तेचा हक्क आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
विधवेचा मुलगा किंवा मुलगी लग्नातून किंवा अवैध संबंधातून जन्माला आली आहे की नाही हे महत्त्वाचे नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती ए. पी. ठाकर यांच्या खंडपीठाने सांगितले की, या प्रकरणात विधवा ही मालमत्तेची मालक आहे. त्यामुळे तिला तिच्या मृत्यूपत्राद्वारे कोणालाही तिचा अविभाजित हिस्सा देण्याचा पूर्ण अधिकार आहे. विशेषत: जेव्हा या मृत्यूपत्राला उच्च न्यायालयात कोणी आव्हान दिले नसेल. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला राज्यघटनेच्या कलम २२६ अन्वये आव्हान देणाऱ्या याचिकेवर खंडपीठात सुनावणी सुरू होती.
वास्तविक, मालमत्तेचे मूळ मालक मखनभाई पटेल यांनी त्यांची पत्नी कुंवरबेन आणि दोन मुलांना मालमत्तेचे वारस बनवले. १९८२मध्ये महसूल अभिलेखातही त्यांची नावे नोंदवली गेली. त्यानंतर कुंवरबेन यांनी त्यांच्या पूर्वीच्या लग्नात जन्मलेल्या मुलाच्या विधवेच्या नावे जमिनीच्या त्यांच्या अविभाजित भागाविषयी मृत्युपत्र लिहिले. ज्या अंतर्गत याचिकाकर्त्याने त्यांच्या भागावर दावा केला. याचिकाकर्ते हे कुंवरबेन यांच्या पूर्वीच्या विवाहातून जन्मलेल्या मुलाच्या विधवेचे वारस आहेत. कुंवरबेन ज्या मालमत्तेच्या पूर्ण मालक होत्या, त्या संपत्तीपैकी तिला तिच्या इच्छेनुसार मृत्यूपत्राद्वारे वाटप करण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.
High Court Order inherit Property right children’s