विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठा तुटवडा असताना तब्बल १० हजार इंजेक्शन खासगी विमानाद्वारे अहमदनगरला आणणाऱ्या खासदार सुजय विखे यांना ही बाब चांगलीच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी आज झाली. न्यायालयाने याप्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तुटवडा असताना सुजय विखे यांनी रेमडेसिविर आणलेच कसे, त्यांना ते मिळाले कसे, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला आहे. तसेच, या प्रकरणात सुजय विखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार सुजय विखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार का आणि दाखल झाला तरी तो कोणता गुन्हा असेल, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
रेमडेसिविर आणल्यानंतर सुजय विखे यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=472746474000667