इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेम हे आंधळे असते असे म्हणत स्वेच्छेने लग्न करणाऱ्या प्रौढ मुलीला पतीसोबत राहण्याचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. प्रेमापुढे आई वडिलांचे वात्सल्यही काम करत नाही असे म्हणत आज जसं ती तिच्या आई – वडिलांसोबत करत आहे, तसंच उद्या तिच्यासोबतही होऊ शकतं, असंही न्यायालयाने मुलीला सुनावलं आहे.
मुलीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. त्यांची मुलगी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होती, मात्र एका ड्रायव्हरने तिला जबरदस्तीने सोबत नेले. उच्च न्यायालयाने मुलगा आणि मुलीला समन्स बजावले. पण मुलगीही त्याच्यासोबत जाण्यास तयार असल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीने स्वत: प्रौढ असल्याचे आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यास सक्षम असल्याचे सांगितले. तसेच स्वेच्छेने ड्रायव्हरसोबत लग्न केल्याची माहिती दिली. शिवाय, त्याच्यासोबतच राहण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे.
यानंतर उच्च न्यायालयाने तिच्या वडिलांची याचिका फेटाळून लावत मुलीला इच्छेनुसार जगण्याचे स्वातंत्र्य दिले. कायदेशीररित्या जोडीदार निवडणे ही समाजाची किंवा पालकांची भूमिका नसून जीवनातील महत्त्वाच्या बाबींमध्ये वैयक्तिक स्वायत्ततेशी संबंधित निर्णय आहे.
मुलीला हे माहित असले पाहिजे की आयुष्य प्रतिक्रिया आणि विचारांनी भरलेले आहे. ती आज तिच्या पालकांसोबत जे काही करत आहे ते उद्या तिच्यासोबत देखील होऊ शकते.
आपल्या इतिहासात आई – वडिलांनी मुलांसाठी आणि मुलांसाठी आई-वडिलांनी जीव दिल्याची उदाहरणे आहेत, पण लक्षात ठेवा की जर मुला-मुलींचे एकमेकांवर प्रेम असेल तर कुटुंबांनी एकमेकांशी तेढ निर्माण करू नये.
मनुस्मृतीमध्ये असे लिहिले आहे की, एखादी व्यक्ती आपल्या आई-वडिलांनी त्याला जन्म देण्यासाठी आणि पालनपोषणासाठी घेतलेल्या कष्टाचे ऋण १०० वर्षांत फेडू शकत नाही, म्हणून जे काही शक्य आहे ते पालक आणि शिक्षकांना प्रसन्न करण्यासाठी केले पाहिजे. याशिवाय कोणतीही धार्मिक पूजा फलदायी नाही.
high court on love father and mother petition legal karnataka