अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद
……
विजय वाघमारे , जळगाव
मुंबई – हत्येच्या आरोपाखाली नाशिक सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या तिघा आरोपींची शिक्षा रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांचा प्रभावी युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला.
या संदर्भात अधिक असे की, २८ मार्च २०१७ रोजी कृष्णा नागे (रा.नाशिक रोड, नाशिक) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पवन बोरसे, अंकुश नाठे व अमोल सहाणे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.तर एप्रिल २०१८ साली नाशिक सत्र न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरुद्ध तिघा आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अॅड. अनिकेत निकम यांनी नाठे व बोरसे यांची बाजू उच्च न्यायालयात मांडली.
अॅड.निकम यांनी उच्च न्यायालयापुढे युक्तिवाद केला की, आरोपींच्या विरोधात असलेला पुरावा हा परिस्थितीजन्य पुरावा आहे. तसेच तपास यंत्रणेने गोळा केलेल्या पुराव्यांची साखळी ही सकृतदर्शनी सदरच्या आरोपीने गुन्हा केला आहे, असे सिद्ध करत नाही. त्याचबरोबर कृष्णा नागे याचा मृत्यू दुर्देवी होता. परंतू आरोपी व कृष्णा नागेचा यामध्ये कुठलेही वैमनस्य नव्हते. तसेच त्याला मारण्याचा कुठलाही हेतू आरोपींकडे नव्हता. सरकारी वकील मिसेस शिंदे यांनी कोर्टापुढे युक्तिवाद केला की, आरोपींना ठोठावलेली शिक्षा ही रास्त आहे व त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा असल्यामुळेच सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
यावर अॅड.निकम म्हणाले की, संपूर्ण खटल्यात कोणताच प्रथमदर्शनी साक्षीदार नाही. तसेच हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे. परिस्थितीतीजन्य पुराव्याला सत्र न्यायालयाने अयोग्य वजन दिले, हे विविध सर्वोच्य आणि उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करून अॅड.निकम यांनी कोर्टापुढे आपले म्हणणे मांडले. तसेच कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी हि सिद्ध होत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आरोपी नाठे व बोरसे यांनी कटकारस्थान करून खून केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरविता येत नाही.
न्या. श्रीमती साधना जाधव आणि न्या. नितीन बोरकर या द्विसदसिय खंडपीठाने सदर युक्तीवाद ग्राह्यधरून राखूंन ठेवलेला निकाल १६ जुलै २०२१ रोजी दिला. तसेच निकाल देतांना निरीक्षण नोंदवले की, आरोपींविरुद्ध सादर केलेल्या पुराव्यांची साखळी ही सिद्ध होत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कट आरोपींन कारस्थान करून खून केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरविता येत नाही. उच्च न्यायालयाने तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे आरोपी पवन बोरसे आणि अंकुश नाठे हे मार्च २०१७ पासून नाशिक कारागृहात भोगत असलेल्या जन्म ठेपेच्या शिक्षेतून लवकरच बाहेर येतील. दरम्यान, या खटल्यात अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला.