चेन्नई – उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून तामिळनाडूच्या वडीपट्टीपर्यंत अनेक होली काऊ म्हणजेच पवित्र विषय किंवा प्रतिके आहेत. त्यांच्यावर विनोद केला जाऊ शकत नाही. परंतु देशातील नागरिकांना हसण्याचे कर्तव्य शिकविण्यासाठी राज्यघटनेत संशोधन करावे लागू शकते, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्ते केले आहे.
तामिळनाडूमधील मदुराईच्या मथिवानन यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याचे आदेश देत न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. अनेक प्रसिद्ध व्यंगचित्रकारांचा उल्लेख करत न्यायाधीश जी.आर. स्वामिनाथन म्हणाले, की हा निर्णय देण्याची संधी मिळाली असती तर मी आवश्य राज्यघटनेच्या अनुच्छेद ५१ ए च्या उपखंड (१) मध्ये संशोधनचा प्रस्ताव दिला असता.
या अनुच्छेदात देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता कायम ठेवणे आणि राज्यघटनेच्या प्रति समर्पण करणे हे नागरिकांचे मूळ कर्तव्य मानले जाते. त्यामध्ये न्यायालयाने आणखी एका हसण्याच्या कर्तव्याचा समावेश करवून घेतला असता. किंवा विनोदी होण्याचा अधिकार अनुच्छेद १९(१) मध्ये सुद्धा समावेश करवून घेतला असता.
कॅमेऱ्याने चित्रीकरणाशी संबंधित पोस्ट
याचिकाकर्त्याने सोशल मीडियावर आपल्या प्रवासाचे फोटो पोस्ट करताना विनोदी ढंगाने ‘शुटिंग (फोटोग्राफी) सरावासाठी सिरुमलाईची सहल’ ही फोटो ओळ दिली होती. तामिळनाडू पोलिसांनी याला शुटिंग (गोळीबार) असे मानून त्यांच्यावर भारत सरकारविरुद्ध युद्ध छेडल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.
न्यायालय पोलिसांना म्हणाले…
उच्च न्यायालय म्हणाले, की या प्रकरणात भारत सरकारविरुद्ध युद्ध छेडल्याचा भादंवि च्या कलम ५०७ लावल्यामुळे आम्हाला हसू आवरत नाहीये. या कलमांतर्गत आरोपीचे नाव उघड होता कामा नये. या प्रकरणात असे काहीच दिसत नाहीये. त्यांनी आपली ओळख लपविली नाही. असा गुन्हा दाखल करणे हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. तसेच काहीच समज नसल्यासारखी गोष्ट आहे.
विनोद करणे, विनोदवीर वेगळ्या गोष्टी
न्यायालय म्हणाले, की विनोदी असणे किंवा विनोद करणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणावर हसावे, हा गंभीर प्रश्न आहे. देशातील अनेक प्रतिकांवर प्रत्येक भागांनुसार विनोद केला जाऊ शकत नाही. जसे बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर, खुशवंत सिंह यांना मोठी किंमत चुकवून ही गोष्ट समजली. तामिळनाडूमध्ये पेरियार श्री इ. व्ही. रामास्वामी सर्वात मोठे प्रतिक आहे. केरळमध्ये आजकाल मार्क्स-लेनिन यांच्यावर विनोद केला जाऊ शकत नाही. देशात प्रतिके ही राष्ट्रीय सुरक्षा आहे. त्यांना देशात हा दर्जा मिळाला आहे.